देशाच्या विकासात हातभार लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 08:58 PM2018-11-18T20:58:15+5:302018-11-18T21:00:19+5:30

राजकारणापेक्षा समाजकारण करा. राजकीय मंडळीनी राजकीय म्हणण्यापेक्षा समाजसेवक, प्रधानसेवक समजून देशाच्या विकासात हातभार लावावा, त्यासाठी संस्काराची गरज असते, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

Contribute to the development of the country | देशाच्या विकासात हातभार लावा

देशाच्या विकासात हातभार लावा

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर : साकोली येथे शामरावबापू कापगते जन्मशताब्दी महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : राजकारणापेक्षा समाजकारण करा. राजकीय मंडळीनी राजकीय म्हणण्यापेक्षा समाजसेवक, प्रधानसेवक समजून देशाच्या विकासात हातभार लावावा, त्यासाठी संस्काराची गरज असते, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
शामरावबापू कापगते जन्म शताब्दी महोत्सवानिमित्ताने कार्यकर्ता मेळावा व शामरावबापू सोबत काम केलेल्या निवडक ज्येष्ठ २० कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा रविवारला साकोली येथे पार पडला. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी विदर्भ प्रांत संघचालक रामजी हरकरे होते. यावेळी आमदार डॉ. परिणय फुके, आमदार बाळा काशिवार, नगराध्यक्ष धनंवता राऊत, माजी आमदार हेमंत पटले, डॉ. राधेश्याम अग्रवाल, मोहन अग्रवाल, जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता साहू, श्यामजी झिंगरे, दादासाहेब टिचकुले, शिवराम गिºहेपुंजे, नेपाल रंगारी, होमराज पाटील कापगते, डॉ. शंकुतला कापगते आदी उपस्थित होते.
ना. हंसराज अहीर यांनी शामरावबापू यांच्या जीवनावर भर घातला. त्यांच्या शेतीविषयक समस्याची जाण, शेती विकासाचे प्रयत्न, बालपणापासून संघाचे निष्ठावान प्रथम स्वंयसेवक, संघबंदीच्या काळात कारावास, कुळकायदा विरोधी आंदोलनात सहभाग, सामाजिक कुप्रथा नष्ट करण्यासाठी समाजात जनजागृती, समाजोन्नतीसाठी सतत प्रयत्नशील, महाराष्ट्र विधानसभेवर जनसंघाचे विधानसभेतील पहिले आमदार, आणिबाणीच्या काळात नागपूर येथे कारावास, अज्ञातशत्रू व्यक्तिमत्व, अशा अनेक कार्याची आठवण केली.
ते म्हणाले, भारत देश लोकशाहीला मानणारा आहे. बाबासाहेबांच्या संविधानामुळे सुसंकारीत चहावाला देशाचा प्रधानमंत्री बनु शकला. देशात आंतकवादी, नक्षलवादी हल्ले होत आहे. यावर आळा बसण्यासाठी जागतीक स्तरावर प्रयत्न सुरु झाले आहे. देशात शांतता व सुव्यस्थेसाठी सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. हेमकृष्ण कागपते यांनी केले. त्यांनी प्रतिष्ठान केलेल्या कार्याची माहिती दिली. आभार नगरसेवक अ‍ॅड.़ मनिष कागपते यांनी मानले. याप्रसंगी साकोली तालुक्यासह परजिल्ह्यातील नागरीक व शामरावबापू कागपते प्रतिष्ठानचे पदाधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Web Title: Contribute to the development of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.