शेंगा पोखरणाऱ्या अळीचे वेळीच नियंत्रण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:18 AM2020-12-28T04:18:48+5:302020-12-28T04:18:48+5:30
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी तूर पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली असून तालुक्यात साधारणपणे साडेतीन ते चार हजार हेक्टरवर तूरीची लागवड ...
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी तूर पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली असून तालुक्यात साधारणपणे साडेतीन ते चार हजार हेक्टरवर तूरीची लागवड केली आहे. सद्यस्थितीत तूर पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून शेंगा परिपक्व होत आहेत. शेतकऱ्यांना तूर पीक फायदेशीर ठरते मात्र वातावरण बदलामुळे शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण करण्याची गरज आहे.
आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे यांनी शेतकऱ्यांना शेतकरी बचत गटाचे महत्व व सेंद्रिय पद्धतीने खत निर्मिती व त्यानुसार शेती करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना स्मार्ट प्रकल्पाविषयी माहिती दिली. यासाठी शेती पूरक उद्योग उभारणीसाठी शेतकरी गटांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कृषीतज्ञ डॉ. सुधीर धकाते यांनी शेतीमध्ये वाढलेला रासायनिक खतांचा अतिवापर व त्याचे आरोग्यावर होत असलेले दुष्परिणाम याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. उत्पादन कमी मिळाले तरी चालेल मात्र रासायनिक खतांऐवजी सेंद्रीय खतांचा वापर वाढविण्याचे त्यांनी सांगितले.
बॉक्स
अशी करा तूर पिकासयाठी उपाययोजना
तुर पिकावरील किडीच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क ५% किंवा अझाडिरेक्टींग ५०० पीपीएम ५० मिलि प्रति हेक्टर किंवा रासायनिक पद्धतीने नियंत्रण करताना क्विनॉलफॉस २५ इसी २८ मिली इमामेक्टीन बेंजोएट पाच इजी तीन ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून शेतकऱ्यांनी फवारणी करावी. यामुळे कीड नियंत्रणात येईल असे कृषी विभागाने सांगितले आहे.
बॉक्स
विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करा
महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे. कृषी विभाग व यांत्रिकी व विभागामार्फत सन २०२० २१ या आर्थिक वर्षात ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित यंत्रे व औजारे,ठिबक, तुषार सिंचन, फळबाग लागवड, शेततळे, शेततळे अस्तरीकरण आदी योजनांसाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी, महाआयटी या पोर्टलवर ३० डिसेंबर पूर्वी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे. २७ लोक ०७ के