खासगी रुग्णालयातील उपचाराचे दर नियंत्रणात ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:35 AM2021-04-18T04:35:20+5:302021-04-18T04:35:20+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोविड आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, अपर ...
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोविड आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नाईक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कोविड रुग्णांना बेड उपलब्ध होण्यासाठी कंट्रोल रूम तयार करून त्या माध्यमातून बेड उपलब्ध करून देण्यात यावे. खासगी रुग्णालयातील कोविड उपचाराचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी दराचा फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्याचे निर्देश द्यावेत, असेही त्यांनी सांगितले. अन्यथा त्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. प्रायव्हेट हॉस्पिटलला परवानगी देताना त्यांचे ऑडिट करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जिल्ह्यात आरटीपीसीआर टेस्ट वाढविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिली. त्यासाठी लॅबची क्षमतासुध्दा वाढवावी असे निर्देश त्यांनी दिले. कोविडचा रिपोर्ट मिळण्यासाठी उशीर होत असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यासाठी आता रुग्णांना एसएमएसव्दारे रिपोर्ट मिळणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
बॉक्स
रेमडेसिविरचा काळाबाजार रोखा
मेडिकल स्टोअर्समध्ये रेमडेसिविर वाजवीपेक्षा अधिक दराने विकली जात असून, रुग्णांना आवश्यकता नसताना अनेकवेळा रेमडेसिविरच प्रीस्क्राईब केली जाते. रेमडेसिविरचा काळाबाजार तत्काळ रोखण्यात यावा. तसेच खासगी डॉक्टर व औषध विक्रेते यांची बैठक घेऊन सूचना द्याव्यात असे त्यांनी सांगितले.