त्या वादग्रस्त वैद्यकीय अधिकाऱ्याची उचलबांगडी होणार चौकशी समिती होणार नेमणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:25 AM2021-06-18T04:25:06+5:302021-06-18T04:25:06+5:30
बॉक्स विविध शासकीय अनुदानासह चौकशीची मागणी यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करताच परिसरात डॉ. खुणे व वादग्रस्त परिचारिकांना पदावरून ...
बॉक्स
विविध शासकीय अनुदानासह चौकशीची मागणी
यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करताच परिसरात डॉ. खुणे व वादग्रस्त परिचारिकांना पदावरून हटविण्याची ओरड सुरू झाली आहे. कोरोनाची स्थिती असताना रुग्णांचे मनोबल वाढविण्याची जबाबदारी आरोग्य विभागावर असतानाही ग्रामीण रुग्णालयात मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच अनेकजण यापूर्वीच्या घटनांची माहिती देत आहेत. सिंहोरा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांच्या असभ्य वर्तवणुकीची चौकशीसाठी समिती नेमण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनातील एका बड्या अधिकाऱ्यांने चौकशी समितीला दुजोरा दिला आहे. परंतु रुग्ण, नातेवाईक व नागरिकांचा चौकशी समितीवर विश्वास नाही. राजकीय पाठबळ असल्याने डॉ. खुणे व वादग्रस्त परिचारिका रुग्णालयात एकाच जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून तळ ठोकून आहेत. त्यामुळे सिहोरा ग्रामीण रुग्णालयाला दिलेल्या विविध शासकीय अनुदानासह चौकशीची मागणीही होत आहे. वादग्रस्त वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांना तत्काळ हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.