आयुष्यमान स्मार्ट कार्डसाठी साकोलीच्या दवाखान्यात सोय करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 09:29 PM2019-02-16T21:29:45+5:302019-02-16T21:30:05+5:30
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजनेचा स्मार्ट कार्ड बनविण्याची व्याप्ती वाढवून उपविभाग साकोली येथे उपजिल्हा रुग्णालय साकोली किंवा साकोली शहरातील खासगी दवाखान्याची निवड करण्यात यावी, अशी मागणी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्यामार्फत प्रधानमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजनेचा स्मार्ट कार्ड बनविण्याची व्याप्ती वाढवून उपविभाग साकोली येथे उपजिल्हा रुग्णालय साकोली किंवा साकोली शहरातील खासगी दवाखान्याची निवड करण्यात यावी, अशी मागणी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्यामार्फत प्रधानमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
आयुष्यमान भारत मिशन अंतर्गत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील नागरिकांना जीवनदान देणारी योजना आहे. गरीबीत सापडलेल्या दुर्धर आजारांच्या रुग्णांना आजारातील संकटांना सक्षमपणे तोंड देण्यासाठी फायदेशीर आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आपल्या आदेशाप्रमाणे दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी भंडारा जिल्ह्यात केवळ पाचच दवाखान्यात सोय उपलब्ध आहे. भंडारा जिल्ह्यातील सदर योजनेतील रुग्णांना तुलनेत पाच दवाखान्यातून सगळ्याच रुग्णांची स्मार्ट कार्ड बनविण्याची प्रक्रिया विहित कालावधीत पूर्ण होणे शक्य नाही.
याकरिता भंडारा जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत साकोली उपविभागातील उपजिल्हा रुग्णालय तसेच खासगी दवाखान्याची किंवा शासकीय कार्यालय किंवा कोणत्याही एजन्सीद्वारे अंमलबजावणी करून गरीब घटकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिेला आहे.
शिष्टमंडळात कैलाश गेडाम, मोहन बोरकर, अचल मेश्राम, सुरेश मेश्राम, विनायक राऊत, मुकुंदा उके, लेहेंद्र गेडाम, मंगल रामटेके, हिवराज राहांगडाले, अरविंद कठाणे, शैलेश गजभिये, सुरेशसिंह बघेल, जयसर मेश्राम, हंसराज साखरे, राजकपूर रंगारी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.