प्रशासनाला सहकार्य करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 05:00 AM2020-04-22T05:00:00+5:302020-04-22T05:00:40+5:30
शासनाने २० एप्रिलपासून काही मार्गदर्शक सूचनेची अंमलबजावणी करुन लॉकडाऊन शिथील केले आहे. यामध्ये काही विभागांना सूट देण्यात आली आहे. त्यामध्ये कृषी व्यवसायावर आधारित उद्योग, पाणी पुरवठा, बांधकाम विषयक क्षेत्राचा समावेश आहे. तालुका व जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी प्रशासनाकडून पासेस देण्यात येणार असल्याची माहिती दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : केंद्र शासनाने २० एप्रिलपासून लॉकडाऊनमधून काही उद्योगांना सूट दिली असून त्याअनुषंगाने राज्य शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसारच उद्योग व्यवसाय सुरू करावेत, असे आवाहन तहसीलदार मलिक विरानी यांनी केले.
तहसील कार्यालय लाखनी येथे व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकारी व व्यावसायिकांसाठी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार मल्लीक विराणी यांनी व्यापाऱ्यांना मार्गदर्शनात सांगितले राज्य शासनाने लॉकडाऊन शिथिल केले असले तरी नागरिकांनी आपली व कुटुंबीयांची सुरक्षा लक्षात घेता मीच माझा रक्षक असा विचार करुन संचार बंदीचे काटेकोरपणे पालन करुन विनाकारण घराबाहेर न पडता स्वत:सह आपल्या कुटबियांची सुरक्षा राखावी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी स्वत: नियमांचे पालन करुन समाजहिताकरिता प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
शासनाने २० एप्रिलपासून काही मार्गदर्शक सूचनेची अंमलबजावणी करुन लॉकडाऊन शिथील केले आहे. यामध्ये काही विभागांना सूट देण्यात आली आहे. त्यामध्ये कृषी व्यवसायावर आधारित उद्योग, पाणी पुरवठा, बांधकाम विषयक क्षेत्राचा समावेश आहे.
तालुका व जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी प्रशासनाकडून पासेस देण्यात येणार असल्याची माहिती दिली. बांधकामावरील कामगारांना ग्रामीण भागात तहसिलदार व शहरी भागात नगर परिषद व नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी पासेस उपलब्ध करून द्याव्यात उद्योगांनी कंत्राटी व स्थायी कामगाराची यादी प्रशासनाला लवकर सादर करावी, असे सांगितले.
ग्रामीण भागातील उद्योगांना लॉगडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. विद्युत, सिंचन, पाणी पुरवठा, बांधकामावरील व्यवस्थापनाने शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन कामगारांना कामावर ठेवावे. वैद्यकीय तपासणी व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य आहे.
बैठकीला ठाणेदार दामदेव मंडलवार, ठाणेदार सुनगार, खंडविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, मुख्यकार्यपालन अधिकारी चिखलगोंदे, व्यापारी असोसिएशनचे नगरसेवक मनोज टहिल्यानी, यासीन आकबानी, अशोक चोले, जावेद लद्धानी, अर्पित गुप्ता, मोहसिन आकबानी, एड. शफीक आदी उपस्थित होते.