थकीत बिल भरून महावितरणला सहकार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:06 AM2021-02-06T05:06:59+5:302021-02-06T05:06:59+5:30

मेळाव्याला कार्यकारी अभियंता नीलेश गायकवाळ, उपकार्यकारी अभियंता सुनील मोहुर्ले व वरठीचे सहायक अभियंता हरीश डायरे उपस्थित ...

Cooperate with MSEDCL by paying the outstanding bill | थकीत बिल भरून महावितरणला सहकार्य करा

थकीत बिल भरून महावितरणला सहकार्य करा

googlenewsNext

मेळाव्याला कार्यकारी अभियंता नीलेश गायकवाळ, उपकार्यकारी अभियंता सुनील मोहुर्ले व वरठीचे सहायक अभियंता हरीश डायरे उपस्थित होते. यावेळी अधीक्षक अभियंता राजेश नाईक यांनी कृषिपंप वीज जोडणी धोरणाबाबत सविस्तर माहिती दिली. ३० मीटरच्या आत सर्व कृषिपंप ग्राहकांना तत्काळ वीज कनेक्शन देण्यात येईल व लघुदाब वाहिनीपासून २०० मीटर अंतराच्या आत एरिअल बंचद्वारे ३ महिन्यांत नवीन वीज जोडणी देण्याचे आश्वासन त्यांनी उपस्थित कृषिपंप ग्राहकांना दिले. २०० ते ६०० मीटर आत असलेल्यांना उच्चदाब वितरण प्रणालीचा पर्याय उपलब्ध आहे. ६०० मीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या कृषी ग्राहकांना सौरऊर्जेचे पर्याय उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. थकबाकीदार ग्राहकांसाठी ५ वर्षांपूर्वीचे संपूर्ण व्याज व विलंब आकार माफ केले असून, मागील ५ वर्षांच्या थकबाकीवरील संपूर्ण विलंब आकार माफ व व्याजदरात सवलत देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी कृषिपंप ग्राहक ताराचंद सीताराम बांते यांनी थकीत बिलाची रक्कम जमा केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला गणेश हिंगे, उपसरपंच कैलास तीतीरमारे, सुरेश रेहपाडे, मुरलीधर बाभरे, धनराज वैद्य, नरेश कळंबे, सुरेश वैद्य, गंगाधर पंचभाई, रामू माटे, रामेश्वर बांते, कृष्णा चकोले, देवीदास ऊईके, सुशील शिंदे, भूषण बावनकुळे, कृष्णा मळके उपस्थित होते.

Web Title: Cooperate with MSEDCL by paying the outstanding bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.