स्वयंपाक घरातून तांब्याची भांडी कालबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:33 AM2018-06-01T01:33:22+5:302018-06-01T01:33:22+5:30

अधिकमास सुरू झाला आहे. या मासात जावयाला तांब्याचे भांडे भेट दिले जाते. मात्र बदलत्या जीवनशैलीचा परिणाम या प्रथा व परंपरेवर होत असल्याचे दिसते. प्राचीन काळापासून वापरात असलेली तांब्याची भांडी अनेक घरांमधून कालबाह्य झाल्याचे दिसते.

Copper utensils are out of the kitchen | स्वयंपाक घरातून तांब्याची भांडी कालबाह्य

स्वयंपाक घरातून तांब्याची भांडी कालबाह्य

googlenewsNext
ठळक मुद्देमहागाईचे सावट : फायबरच्या भांड्यांचा वाढता वापर

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : अधिकमास सुरू झाला आहे. या मासात जावयाला तांब्याचे भांडे भेट दिले जाते. मात्र बदलत्या जीवनशैलीचा परिणाम या प्रथा व परंपरेवर होत असल्याचे दिसते.
प्राचीन काळापासून वापरात असलेली तांब्याची भांडी अनेक घरांमधून कालबाह्य झाल्याचे दिसते. त्यांची जागा आता स्टेनलेस स्टील व फायबरच्या भांड्यांनी घेतली आहे. आरोग्य सुदृढ रहावे यासाठी पूर्वीच्या काळी तांब्याची भांडी वापरली जात असत. मात्र कालौघात तांब्याची भांडी दुर्मिळ झाल्याचे चित्र आहे.
नव्या पिढीकडून रेडिओ, टीव्ही, जुन्या लाकडी खुर्च्यांसह अन्य जुन्या काळातील वस्तूंचा वापर होत नसल्याचे दिसते. यातच तांब्याची भांडीदेखील हद्दपार करुन आता फायबर व स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा वापर सर्रास सुरू झाला आहे. सध्याच्या काळात केवळ गरजेपुरताच तांब्याच्या भांड्यांचा वापर होताना दिसतो. धार्मिक कार्यात आजही आवर्जून तांब्याची भांडी वापरली जातात.
तांबा या धातूचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो. तांबा वाहक असल्यामुळे विद्युत करंट पुरवठ्यासाठी या तारांचा उपयोग केला जातो. रबरची कोटींग असलेल्या तांब्याच्या तारांचा उपयोग वायर म्हणून घरातील वीज जोडणीसाठी केला जातो.
तांबा हा धातू बहुगुणी असून आरोग्यासाठी अतिशय उत्तम असल्याचा उल्लेख आयुर्वेदात आढळतो.
तांब्याच्या भांड्यात रात्री पाणी भरून ते सकाळी उपाशीपोटी प्यायल्याने अनेक आजार नाहिसे होतात, असे तज्ज्ञ सांगतात. स्टीलच्या भांड्यांपेक्षा तांब्याच्या भांड्यांचा वापर अधिक होत असलेले स्वयंपाकघर आता दुर्मिळच झाल्याचे चित्र आहे. तांबे हे खाद्यपदार्थातील विषाणूंचा नायनाट करते, असे सांगतात. मात्र ग्रामीण भागासह शहरातूनही तांब्याची भांडे हद्दपार होत असल्याचे दिसून येते.
सुदृढ आरोग्यात सहायक
प्राचीन काळापासून होत असलेल्या तांब्याच्या भांड्यांचा वापरावर विज्ञानानेही शिक्कामोर्तब केले आहे. दैनंदिन वापरात स्टील, फायबर यांचा वापर वाढला आहे. या वस्तूंवर विषाणू जमल्यास त्याचा नायनाट लवकर होत नाही. ही बाब आरोग्याकरिता धोक्याची ठरते.

Web Title: Copper utensils are out of the kitchen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.