कोरोनामुळे होऊ शकतो किडनीवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:24 AM2021-06-17T04:24:44+5:302021-06-17T04:24:44+5:30
भंडारा : आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मानवी शरीरातील मूत्रपिंडांचे कार्य योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते. मूत्रावाटे शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर ...
भंडारा : आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मानवी शरीरातील मूत्रपिंडांचे कार्य योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते. मूत्रावाटे शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर काढण्याचे कार्य मूत्रपिंड म्हणजे किडनी करीत असते. मात्र कोरोनाच्या काळात किडनीवरही याचा परिणाम होऊ शकतो. यात चिंता न करता सजगता बाळगून योग्य वेळी उपचार करून घ्यायला हवेत.
कोरोना होऊन गेल्यानंतर दोन ते तीन महिन्यांनंतर शरीरातील विविध अवयवांवर परिणाम जाणवू शकतो. किंबहुना कधी कुणाला परिणाम जाणवत नाही. शरीरात त्रास होत असेल तर ती गोष्ट लपवू नये. शरीरात असंख्य रक्तधमन्या असून त्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या पडल्यास त्यामुळे हृदय व अन्य अवयवांवर ताण पडू शकतो. विषाणूचा संसर्ग होण्यापूर्वी मूत्रपिंडाचा आजार असलेल्या रुग्णांना बरे झाल्यानंतर मूत्रपिंडाचे कायमचे नुकसान होत असल्याची बाबही तज्ज्ञ डॉक्टरांना निदर्शनास आली आहे.
कोरोनानंतर संक्रमित यांनी संबंधित चाचपणी करून घेतल्यास संभाव्य धोका टाळता येऊ शकतो. मात्र त्यापासून पॅनिक व्हायला नको.
बॉक्स
किडनीचा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाने ऑक्सिजन, आयसीयू यांच्या व्यतिरिक्त डायलिसिसची सुविधा तिथे आहे किंवा नाही हे माहीत करून घेणे आवश्यक आहे. कुठल्याही बाबतीत घाबरायचे नाही. या आजारावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना किडनीची माहिती किंवा हिस्ट्री द्यायला सांगावी. त्यानंतरच उपचार करावा.
बॉक्स
स्टेरॉईड कन्सल्टंट ठरवील
वैद्यकीय कन्सल्टंटला भेटून कोरोनाच्या पहिल्या लाटेत स्टेरॉईड देण्यात आले आहे किंवा नाही याची माहिती द्यावी. किडनी आजार कोणत्या लेव्हलवर आहे, हे कधीही रुग्ण सांगू शकत नाही. वैद्यकीय तज्ज्ञ किंवा किडनी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी ही बाब उत्तमरीत्या सांगू शकतो. त्यामुळे डॉक्टरांशी बोलूनच स्टेरॉईड द्यायचे की नाही, हे ठरवून घ्यावे.
बॉक्स
हे करा
कोविड १९ रुग्णालयात डायलिसिसची सुविधा आहे. तिथेच व किडनी रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घ्यावे. किडनी रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्यास सर्वोत्तम डॉक्टरकडे किडनीवरील उपचार सुरू आहेत का, याबद्दल त्यांना माहिती द्यावी.
बॉक्स
हे करू नका
किडनी तज्ज्ञांसह कोरोनावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून किडनीच्या आजाराबाबत कुठलीही गोष्ट लपवून ठेवू नका. ज्या दिवशी डायलिसिस ठरले असेल ते करून घ्या. तसेच विशेष म्हणजे या परिस्थितीत कुठल्याही मानसिक त्रास करून घेऊ नका.
कोट बॉक्स
कोरोना झालेल्या रुग्णांच्या शरीरात रक्ताच्या धमन्यांमध्ये गुठळ्या बनू शकतात. यामुळे नियमित अंतराने ‘डी डायमर’ टेस्ट चाचपणी करून घ्यावी. यात घाबरण्याचे कुठलेही कारण नाही. मात्र मनातील शंका दूर करणे अत्यंत आवश्यक आहे. सात्त्विक आहार घेणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.
- डॉ. नितीन तुरस्कर, किडनीतज्ज्ञ, भंडारा.