कोरोनामुळे विदर्भाची मिनी पंढरी असलेली माडगी यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:15 PM2020-12-05T16:15:09+5:302020-12-05T16:15:45+5:30
Bhandara news Yatra विदर्भाची मिनी पंढरी म्हणून मोहाडी तालुक्यातील माडगी येथे दरवर्षी कार्तिक अमावस्यापासून १५ दिवस यात्रा भरत होती. मात्र यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने ही यात्रा रद्द करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: विदर्भाची मिनी पंढरी म्हणून मोहाडी तालुक्यातील माडगी येथे दरवर्षी कार्तिक अमावस्यापासून १५ दिवस यात्रा भरत होती. मात्र यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने ही यात्रा रद्द करण्यात आली आहे.
सात दिवसांपासून यात्रा भरण्यास सुरूवात होत असते. परंतु, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात मागील दहा वर्षांपासून यात्रेकरूंची संख्या रोडावली असून केवळ रविवारी सुटीच्या दिवशी येथे पर्यटक येताना दिसून येतात. तुमसर- गोंदिया या राज्य महामार्ग व मुंबई-हावडा या रेल्वे मार्गावर बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीपात्रात सदर यात्रा कार्तिक पोर्णिमा झाल्यानंतर अमावस्येपासून १५ दिवसांकरिता भरत असते. २५ वर्षांपूर्वी येथे महाराष्ट्र तथा मध्यप्रदेशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत होते. नदीपात्र भाविकांनी फुलून जात होते. मात्र यंदा कोरोनाच्या सावटामुळे येथील यात्रा रद्द करण्यात आली आहे.