झोपडपट्टी परिसरात कोरोना नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:44 AM2020-12-30T04:44:31+5:302020-12-30T04:44:31+5:30

भंडारा : विश्वात कोरोना महामारीने हाहाकार माजविला. याचे पडसाद सर्वच स्तरात दिसून आले. गरीब असो की श्रीमंत. कोरोनाचा ...

Corona control in slum areas | झोपडपट्टी परिसरात कोरोना नियंत्रणात

झोपडपट्टी परिसरात कोरोना नियंत्रणात

Next

भंडारा : विश्वात कोरोना महामारीने हाहाकार माजविला. याचे पडसाद सर्वच स्तरात दिसून आले. गरीब असो की श्रीमंत. कोरोनाचा फटका सर्वांनाच बसला. शहरातील स्लम एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झोपडपट्टी भागातही कोरोनाने शिरकाव केला. भंडारा शहरातील बोटांवर मोजण्याइतपत असलेल्या झोपडपट्टीतही माहितीनुसार आठ कोरोनारुग्ण आढळून आले. मात्र सर्व रुग्ण बरे होऊन घरी परतले.

जिल्ह्यात आजघडीला १२ हजार २६२ कोरोना रुग्णांची संख्या आहे. २९१ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला असला तरी झोपडपट्टी भागात आढळलेल्या रुग्णांपैकी एकाचाही मृत्यू झाला नसल्याचे समजते. भंडारा शहरातील सर्वात मोठी झोपडपट्टी राजेंद्र नगर वाॅर्डात आहे. या परिसरात २०० पेक्षा जास्त झोपड्या असून दाटीवाटीने लागुन आहेत. परिणामी कोरोना संक्रमण काळात इथे रुग्णांचे प्रमाण जास्त असेल असे वाटले होते. मात्र माहितीनुसार फक्त एक रुग्ण आढळुन आला. परिसर मोठा असुन त्यानंतर भंडारा - वरठी मार्गावरील उजव्या कडेला मोठी वस्ती आहे. यात अनेक लहान मोठी घरे आहेत. राजेंद्र वाॅर्डातील झोपडपट्टीवासीयांना अजूनही मुलभूत सुविधांपासुन वंचित राहावे लागत आहे. अशीच समस्या प्रत्येक झोपडपट्टी परिसरात दिसून येते. यासोबतच राजीव गांधी चौक परिसरातील रेल्वे लाईन भागात झोपडपट्टी आहे. इथे आजपर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. याशिवाय सामान्य जिल्हा रुग्णालय परिसर, वैनगंगा नदी काठावरील परिसरात झोपडपट्टी असून तिथेही कोरोनारुग्ण आढळून आला नसल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या बाबतीत जिल्हा आरोग्य खात्याकडे या संबंधात नेमकी माहिती उपलब्ध नाही. लोकमत प्रतिनिधीने याबाबत प्रत्यक्षरित्या सहानिशा केल्यावर रुग्णांची संख्या कळू शकली. विशेष म्हणजे सर्व रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. साधी राहणीमान असल्याने तसेच रोग प्रतीकार क्षमताही चांगली असल्याने या महामारीवर नियंत्रण मिळविण्यात यश लाभले.

सुरुवातीपासुनच आरोग्य प्रशासन रुग्णांबाबतीत काळजी घेऊन आहेत. निर्माण झालेल्या परिस्थितीवर असे नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने रुग्ण बरे होण्याचा दरही वाढला आहे. ही निश्चितच सकारात्मक बाब आहे.

- डाॅ. निखील डोकरीमारे, आरएमओ बाह्य विभाग

झोपडपट्टी परिसर रूग्ण कोरोनामुक्त

राजेंद्रनगर झोपडपट्टी ०१ ०१

रेल्वे परिसर ०० ००

नदीकाठ परिसर ०० ००

रुग्णालय परिसर ०२ ०२

टाकळी परिसर ०५ ०५

Web Title: Corona control in slum areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.