कोरोनाने बिघडली ग्रामीण विद्यार्थ्यांची शैक्षणिक घडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:16 AM2021-09-02T05:16:51+5:302021-09-02T05:16:51+5:30

बारव्हा : गत वर्षभरापासून कोरोनामुळे प्राथमिक शाळा बंदच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासच नसल्यामुळे सध्या ती पुस्तके उघडण्याऐवजी फक्त खेळण्यातच ...

Corona disrupts rural students' education | कोरोनाने बिघडली ग्रामीण विद्यार्थ्यांची शैक्षणिक घडी

कोरोनाने बिघडली ग्रामीण विद्यार्थ्यांची शैक्षणिक घडी

googlenewsNext

बारव्हा : गत वर्षभरापासून कोरोनामुळे प्राथमिक शाळा बंदच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासच नसल्यामुळे सध्या ती पुस्तके उघडण्याऐवजी फक्त खेळण्यातच व्यस्त आहेत. दरम्यान, अभ्यासाची सवय बंद झाल्याने प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांची शैक्षणिक घडीच बिघडली आहे.

कोरोनाचा देशात शिरकाव होण्यापूर्वी सर्व शाळा नियमित सुरू होत्या. त्यामुळे विद्यार्थी दिवसभर शाळेत व्यस्त राहत असत, तर घरी आल्यानंतर शाळेतून मिळालेला गृहपाठ करण्यात व्यस्त राहत असत. परंतु कोरोनामुळे दीड वर्षापासून सर्वच शाळा बंद करण्यात आल्या व यावर्षीच्या सत्रात शाळा सुरू न केल्यामुळे मुलांचा दिनक्रमच बदलल्याने ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण घेणारे विद्यार्थी निव्वळ खेळण्यातच दंग राहत आहेत. एक-दोन वर्षांपूर्वी शाळेत दाखल झालेली काही लहान मुले तर चक्क शाळेत शिकलेली अक्षरओळख व इंग्रजी वर्णाक्षरेसुद्धा विसरली आहेत.

पुन्हा एकदा कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविला जात असल्याने मागीलवर्षीप्रमाणेच याहीवर्षीच्या सत्रात शाळा बंदच राहील की काय, असा प्रश्न पालकांपुढे उभा आहे. एकंदरीत कोरोनामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांची शैक्षणिक घडी बिघडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

कोट

कोरोनामुळे शाळा कधी सुरू होतील हे अनिश्चित आहे.

कोट

मुले-मुली घरच्या घरी खोडकरपणा करण्यात व खेळण्यात बेभान आहेत, तर शिकलेला काही अभ्यासक्रम विसरली आहेत. अभ्यास करण्याबाबत त्यांना सांगितल्यास, शाळा बंद आहे हे कारण सांगून, ती काही ऐकायलाच तयार नाहीत. त्यामुळे आता त्यांच्या भविष्याबद्दल काळजी वाटू लागली आहे.

- रेवाचंद शेंदरे, पालक

कोरोना महामारीमुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी आकलन क्षमतेच्या बाहेर गेला असून, त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकांना येणाऱ्या काळात बरीच मेहनत घ्यावी लागेल. शाळा अजूनही बंद आहेत. पालक व शासनाच्या समन्वयातून शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा करावा.

- मनोज बडोले, पालक

Web Title: Corona disrupts rural students' education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.