कोरोना महामारीमुळे व्याघ्र पर्यटनाला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:22 AM2021-06-30T04:22:58+5:302021-06-30T04:22:58+5:30
नुकताच ५ जूनला पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. प्रकल्प कार्यालयात देखील सदर दिनाचे महत्त्व लक्षात ठेऊन वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात ...
नुकताच ५ जूनला पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. प्रकल्प कार्यालयात देखील सदर दिनाचे महत्त्व लक्षात ठेऊन वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. प्रादेशिक वनक्षेत्राधिकारी कोमल जाधव व व्याघ्र प्रकल्प अधिकारी घाडगे यांनी पर्यावरणासाठी वृक्षांची लागवड करण्याचा सल्ला दिला. व्याघ्र प्रकल्पात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना न्याय्यहक्क मिळवून देण्यासाठी व्याघ्र प्रशासन शासनाला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न करीत आहे.
मागील दिवसात पवनी गेटचे पर्यटन वाढले होते. आशिया खंडात प्रसिद्ध असलेला जय नावाच्या वाघाला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी उमरेड-कारांडाला व्याघ्र प्रकल्प पवनी गेटवर व्हायची. यातून विभागाला होणारा महसूल मोठा असायचा. आता देशात कोरोनाने तोंड वर केल्यामुळे संचारबंदी व जमावबंदी असल्या कारणाने पर्यटकांनी पाठ फिरविली असल्याचे चित्र आहे. दरम्यान, पर्यटनातून होणारे अर्थार्जन तोकडे झाल्याचे सांगण्यात आल्याने पर्यटनाला फटका बसत आहे. तथापि, व्याघ्र प्रकल्पाने कोरोना पार्श्वभूमीवर केलेला अंमल अभिनंदनास पात्र असल्याचे बोलल्या जात आहे.