कोरोना महामारीमुळे पाळणा लांबला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:36 AM2021-05-18T04:36:54+5:302021-05-18T04:36:54+5:30
यातून काही लग्न गेल्या दोन वर्षांपासून रेंगाळत आहेत. गावपातळीवर लग्नाची संख्या कमी झाली आहे. आरटीपीसीआर टेस्ट आणि कमी उपस्थिती ...
यातून काही लग्न गेल्या दोन वर्षांपासून रेंगाळत आहेत. गावपातळीवर लग्नाची संख्या कमी झाली आहे. आरटीपीसीआर टेस्ट आणि कमी उपस्थिती या कारणांमुळे लग्नाच्या प्रमाणात घट नोंदविली गेली आहे. २०१९ मध्ये ५१ विवाहाची नोंदणी झाली होती. आता ही नोंदणी १८ च्या घरात आहे. याचा परिणाम जन्मदरावरही झाला आहे. त्याचप्रमाणे कोरोना काळात मृत्यूची संख्या वाढल्याने मृत्यूदरात मोठ्या संख्येने वाढ नोंदविली जात आहे. काही गावांचा अहवाल सादर झाल्यावर २०२१ ची नोंद पुढे येणार आहे.
बॉक्स
कोरोना काळात विविध नियमांमुळे लग्नाची संख्या घटली आहे. याचा परिणाम समाज व्यवस्थेवर पाहायला मिळत आहे. पूर्वीच्या तुलनेत धूमधडाक्यात होणारी लग्ने आता मर्यादित खर्चात आणि मर्यादित उपस्थितीमध्ये पार पाडावी लागत आहे. यामुळे अनेकांनी थाटामाटात होणारी लग्ने थांबली आहेत. लॉकडाऊननंतर त्यात वाढ होईल.
बॉक्स
जन्मदरातही घसरण
जिल्ह्यामध्ये लग्नाची संख्या घटली आहे. नोंदणीकृत विभाग पूर्वीच्या तुलनेत ३३ ने कमी झाला आहे. परिणामी जन्मदरातही घट नोंदविण्यात आली आहे. गावांमधील लग्नांची संख्या घटली आहे.