भंडारा जिल्ह्यात कोरोनामुक्तांचा विक्रम; ४५३ रूग्णांची घरवापसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 05:55 PM2020-09-28T17:55:56+5:302020-09-28T17:56:16+5:30

भंडारा  जिल्ह्यात सोमवारी कोरोनाबाधितांपैकी ४५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून जिल्ह्याच्या रिकव्हरी रेटमध्ये वाढ होऊन तो ६७ टक्क्यांवर गेला आहे.

Corona free record in Bhandara district; 453 patients now at home | भंडारा जिल्ह्यात कोरोनामुक्तांचा विक्रम; ४५३ रूग्णांची घरवापसी

भंडारा जिल्ह्यात कोरोनामुक्तांचा विक्रम; ४५३ रूग्णांची घरवापसी

Next
ठळक मुद्दे१५७ कोरोना पॉझिटिव्ह तर २ मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :  जिल्ह्यात सोमवारी कोरोनामुक्तांच्या संख्येने विक्रम केला आहे. कोरोनाबाधितांपैकी ४५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून जिल्ह्याच्या रिकव्हरी रेटमध्ये वाढ होऊन तो ६७ टक्क्यांवर गेला आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३४१ झाली असून आज १५७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५१०७ झाली आहे.

आतापर्यंत ३४१२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या ५१०७ झाली असून १५९० क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या २ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण १०५ झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६७ टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर ०२.५ टक्के एवढा आहे. आज आयसोलेशन वार्डमध्ये १८२ व्यक्ती भरती असून २०३३ व्यक्तींना आयसोलेशन वार्डमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Web Title: Corona free record in Bhandara district; 453 patients now at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.