कोरोनाने जीडीपीवर विपरीत परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 05:00 AM2020-08-17T05:00:00+5:302020-08-17T05:00:03+5:30
विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याचा विकासात्मक कार्यावर परिणाम जाणवेल, असा अंदाज राष्टÑवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा खासदार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला. येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत औपचारीक बैठकींनंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना ही वैश्विक महामारी आहे. या महामारीचा सर्वांनाच फटका बसला आहे. केंद्राच्या वित्त समितीच्या बैठकीतही सकल देशातंर्गत उत्पादनावर (जीडीपी)
विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याचा विकासात्मक कार्यावर परिणाम जाणवेल, असा अंदाज राष्टÑवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा खासदार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला. येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत औपचारीक बैठकींनंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
खा. पटेल म्हणाले, भंडारातील शटल रेल्वेचा हा ज्वलंत प्रश्न आहे.
रेल्वेचे रूळ काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शहरवासीयांसाठी शटल रेल्वे होणे ही बाब स्वप्नपूर्ती होती. मात्र या अपेक्षांवर पाणी फेरण्यात आले आहे. ही गंभीर बाब आहे. परिणामी रेल्वेसाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल, असे संकेतही त्यांनी दिले. तसेच याबाबत मित्रपक्षांनी आंदोलन उभारले तर आमचा त्याला सक्षम पाठिंबा राहील, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. केंद्राने घोषित केलेल्या राष्ट्रीय शिक्षण पद्धतीवर केंद्राचा धोरणात्मक निर्णय योग्य असून त्यात काळानुरूप बदल होणे अपेक्षित होते. त्यावर आक्षेप घेण्यासारखे काही नाही. आणखी त्यात चांगले बदल घडवून आणायचे असेल तर सूचना केल्यास योग्य ठरेल.
धानाचा बोनस लवकरच देण्यात येणार असून हुंडी पाठवायला उशीर झाल्याने उरलेला निधी द्यायला विलंब झाल्याचेही खा.पटेल यांनी सांगितले.
कोरोना संकटकाळात हॉटेल्स, विमान, रेल्वे सेवा, पर्यटन या सर्वांवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम जाणवला आहे. याचा सरळ-सरळ फटका यावर आधारीत असंख्य कुटुंबाना बसला आहे. या संकटातून सर्वांच्या सहकार्यातून मार्ग काढायला हवा, असे मतही त्यांनी व्यक्त केले. यासह संकटग्रस्तांना केंद्र सरकारने मदतीचा तातडीने हात देण्याची आज नितांत गरज असल्याचे याप्रसंगी खा.पटेल यांनी सांगितले. पत्रपरिषदेला माजी खासदार मधुकर कुकडे, आमदार नरेंद्र भोंडेकर, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व अन्य पदाधिकारी उपस्थित होते