वरठी होऊ पाहतोय ‘कोरोना हॉटस्पॉट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 05:00 AM2020-08-07T05:00:00+5:302020-08-07T05:01:16+5:30
दिवसेंदिवस या कंपनीतील कामगार कोरोना बाधित असल्याचे प्रकरण समोर येत असल्याने गावात चिंता व्याप्त आहे. जिल्हा प्रशासनाने यावर तत्त्काळ प्रतिबंधित उपाय न केल्यास जिल्ह्यात सर्वाधिक भयावह परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोहाडी तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा ३२ वर आहे. यातील अर्धेअधिक कोरोना बाधित हे वरठी परिसरातील आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : येथील एका कंपनीत कोरोनाने शिरकाव केला आहे. कंपनीत उत्पादित माल तपासणीकरिता आलेला अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह निघाला. प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या कामगारांनाही यापासून धोका निर्माण झाला आहे. कोरोनाच्या कंपनीतील एंट्रीने वरठी परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरणार अशी भीती व्यक्त होत आहे.
दिवसेंदिवस या कंपनीतील कामगार कोरोना बाधित असल्याचे प्रकरण समोर येत असल्याने गावात चिंता व्याप्त आहे. जिल्हा प्रशासनाने यावर तत्त्काळ प्रतिबंधित उपाय न केल्यास जिल्ह्यात सर्वाधिक भयावह परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोहाडी तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा ३२ वर आहे. यातील अर्धेअधिक कोरोना बाधित हे वरठी परिसरातील आहेत.
उत्पादित सामान तपासणी करिता आलेला इसम कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. सदर अधिकारी हैद्राबाद येथे उपचार घेत आहे. तो अधिकारी वरठी येथील सॅनफ्लॅग कंपनीत जुलै महिन्यात चार दिवस मुक्कामी होता. त्याची प्रकृती खालावल्याने त्याला येथून माघारी पाठवण्यात आल्याची चर्चा आहे. अधिकारी आजारी असल्याचे प्रकरण तापले आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या कामगारांना शोधणे सुरू आहे. वेळेवर प्रयत्न न करता कंपनीच्या व्यवस्थापनाने हलगर्जीपणा केल्याची चर्चाही गावात ऐकावयास आहे.
या प्रकरणानंतर कंपनीत खासगी व्यवस्थेकडून कामगारांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यात ५६ कामगारांची काल तपासणी करण्यात आली. पण याबाबद कंपनी व्यवस्थापन कमालीची गुप्तता पाळत असल्याचे निदर्शनास आले आहे.
कामगारांची कोरोना तपासणी परस्पर खासगी व्यवस्थेकडून करून याबाबदचा अहवाल अजून जाहीर करण्यात आला नाही. आज कंपनी कॉलोनीतील काही कामगारांना रूग्णवाहिकेने उपचारासाठी नेण्यात आले. तालुक्यात कोरोना बाधित निघणाºया यादीत सदर कंपनीशी संबधीत कामगारांची संख्या जास्त आहे. यामुळे गावात धास्तीचे वातावरण आहे.
कोरोनाच्या शिरकावाने झपाट्याने वाढले रूग्ण
कोरोनाच्या वाढत्या संकटाला टाळण्यासाठी खबरदारी हाच एकमेव उपाय आहे. तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता दिशानिर्देश पाळले पाहिजे. सुरक्षित अंतर, तोंडाला मास्क यासह अकारण बाहेर पाळणे टाळावे असे आव्हान तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास मेश्राम यांनी केले आहे. कामानिमित्त बाहेर जाणाऱ्यांनी आवश्यक खबरदारी व सुरक्षा साधने आवर्जून बाळगावी असे सांगितले.
नागरिकांचा जीव टांगणीवर
वरठी परिसरात कोरोना झालेला शिरकाव हे त्या कंपनीच्या हलगर्जीपणामुळे झाले आहे. आवश्यक ती खबरदारी न घेता कामगाराच्या जीवाशी खेळ खेळत आहे. वरठी व परिसरातील नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. या प्रकरणाचा तपास करून हयगय करून माहिती दडवणारे कंपनीचे वैदकीय अधिकारी व व्यवस्थापन यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शरदचंद्र वासनिक यांनी केली आहे.