कोरोनासदृश आजार वाढले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:35 AM2021-04-16T04:35:27+5:302021-04-16T04:35:27+5:30
गटार नाल्यातून डासांची संख्या सुमार वाढलेली आहे. डासांमुळे गावात डेंगू, मलेरियासदृश आजारांचे रुग्ण वाढत आहेत. दवाखान्यात गर्दी होत आहे. ...
गटार नाल्यातून डासांची संख्या सुमार वाढलेली आहे. डासांमुळे गावात डेंगू, मलेरियासदृश आजारांचे रुग्ण वाढत आहेत. दवाखान्यात गर्दी होत आहे. साधारण जरी ताप आला तरी कोरोनाची भीती मनात भय वाढवीत आहे. अशा कठीण प्रसंगात शासनाने पुरविलेल्या निर्देशानुसार स्वच्छता अभियान अत्यंत महत्त्वाचा आहे.
तालुक्यातील काही गावात धूळरणी केली जात आहे. तशीच व्यवस्था पालांदूर येथेसुद्धा व्हावी.
जिल्हा मलेरिया विभाग, जिल्हा आरोग्य विभाग व ग्रामपंचायत यांच्या सहयोगातून गावात डास निर्मूलन मोहीम राबविणे अत्यंत आवश्यक आहे. स्थानिक ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शक्य ती स्वच्छता सुरू आहे. सर्वाधिक खर्च स्वच्छता मोहिमेवरच वापरला जातो. हे नक्कीच प्रशंसनीय आहे. तरी मात्र वास्तवतेच्या आधार घेत प्रसंगावधान राखत आणखी स्वच्छता मोहीम वाढविण्याची गरज आहे.