कोरोनामुळे अकाली मृत्यू वाढले; मृत्यूपत्र करणाऱ्यांची संख्याही वाढली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:26 AM2021-06-01T04:26:51+5:302021-06-01T04:26:51+5:30

भंडारा : कोरोनामुळे जीवनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. परिणामी ज्येष्ठ नागरिकांसह तरुण दाम्पत्य मृत्युपत्र तयार करण्यासाठी वकिलांशी संपर्क साधत ...

Corona increased premature death; Death toll rises | कोरोनामुळे अकाली मृत्यू वाढले; मृत्यूपत्र करणाऱ्यांची संख्याही वाढली !

कोरोनामुळे अकाली मृत्यू वाढले; मृत्यूपत्र करणाऱ्यांची संख्याही वाढली !

googlenewsNext

भंडारा : कोरोनामुळे जीवनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. परिणामी ज्येष्ठ नागरिकांसह तरुण दाम्पत्य मृत्युपत्र तयार करण्यासाठी वकिलांशी संपर्क साधत आहेत. पूर्वी अतिश्रीमंतांमध्ये होणारे मृत्युपत्र आता सर्वसामान्यांमध्येही दिसून येत आहे. मृत्युपत्र कौटुंबिक स्वास्थ्यासाठी चांगले असले तरी या महामारीमुळे लोकांच्या मनात मृत्यूचे भय वाढत असल्याची जाणीव होत आहे.

जिल्ह्यात ५८ हजारांच्यावर कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली आहे, तर १०५४ च्यावर बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बहुतांश कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. अकाली मृत्यूमुळे मालमत्ता हस्तांतरासह इतर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे आपल्या पश्चात कुटुंबाला या समस्या भेडसावू नयेत, या उद्देशाने अनेकजण मृत्युपत्राचा आधार घेत आहेत. यामध्ये वकिलांमार्फत केल्या जाणाऱ्या रजिस्टर मृत्युपत्रासह स्वत: पेपरवर मृत्युपत्र लिहित आहेत.

जमा केलेले मृत्युपत्र करण्यावर भर

बऱ्याचदा मृत्युपत्रातील मजकुराची माहिती घरातील सदस्यांना मृत्यूपर्वी होऊ द्यायची नसते. तेव्हा नोंदणी करणारा नोंदणीकृत केलेले मृत्युपत्र पाकिटात सील करून दुय्यम निबंधकाकडे जमा करतो. याला जमा केलेले मृत्युपत्र असे म्हणणात. जिल्ह्यात काही प्रमाणात असे मृत्युपत्र होत असताना दिसून येत आहे.

३० टक्क्यांनी वाढ

संसर्गजन्य आजारांमुळे या नाशिवंत शरीराचा काही भरोसा नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना वकिलांकडे मृत्युपत्राबाबत चौकशी करणाऱ्यांची संख्या ३० ते ४० टक्क्यांनी वाढली आहे. पूर्वी वयोवृद्धांकडून मृत्युपत्राबाबत विचारपूस व्हायची आता नवविवाहित देखील मृत्युपत्र करीत आहेत.

आवश्यक कागदपत्रे

केवळ बौद्धिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती मृत्युपत्र तयार करू शकताे. मृत्युपत्र करताना डॉक्टरांचे आरोग्याच्या स्थितीबाबतचे प्रमाणपत्र, दोन साक्षीदारांच्या सह्या आवश्यक आहेत.

नाममात्र शुल्कात नोंदणी

स्वमेहनतीने कमावलेल्या मालमत्तेचे मृत्युपत्र न करता एखादी व्यक्ती मरण पावली तर त्यांच्या कायदेशीर वारसांना त्यांचे नाव त्या संपत्तीत नोंदविण्यासाठी वारसाने हक्क प्रमाणपत्र न्यायालयातून मिळवावे लागते. त्यासाठी संपत्तीच्या मूल्यांकनानुसार साधारण ७५ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. मृत्युपत्र मात्र कितीही मालमत्ता असली तरी नाममात्र नोंदणी शुल्क भरून करता येते. साधारण वकिलाचा खर्च पकडून नोंदणीकृत मृत्युपत्र दोन ते तीन हजार रुपयात तयार होते. तसा नोंदणी खर्च तर फक्त शंभर रुपये आहे.

कोरोनामुळे जीवनाची अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यातच कोरोनामुळे वेगवेेगळ्या ठिकाणी असणारे कुटुंबीय एकत्र आले आहेत. त्यामुळे आपसूकच संपत्तीच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. त्यामुळे अनेकजण वकिलांकडून मृत्युपत्र तयार करताना दिसून येत आहे. नोंदणी कायद्यानुसार मृत्युपत्राची नोंदणी ऐच्छिक आहे. इच्छा असल्यास मृत्युपत्राची नोंदणी करता येऊ शकते. वाद निर्माण झाल्यास अनोंदणीकृत मृत्युपत्राच्या तुलनेत नोंदणीकृत मृत्युपत्र सिद्ध करणे सोपे असते. म्हणून नोंदणी करणे केव्हाही श्रेयस्कर ठरते. स्वत:च्या मेहनतीने कमावलेल्या मालमत्तेची व्यवस्था न केल्यामुळे आपल्या मृत्युनंतर कौटुंबिक कलह निर्माण होतात. हे घरगुती वाद टाळण्यासाठी मृत्युपत्राचा दस्त महत्त्वाचा ठरतो.

-ॲड. प्रशांत गजभिये, लाखनी.

Web Title: Corona increased premature death; Death toll rises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.