कोरोनामुळे वाढला १०८ रुग्णवाहिकांवरील ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:37 AM2021-05-06T04:37:31+5:302021-05-06T04:37:31+5:30
गोंदिया जिल्ह्यात १०८च्या एकूण १५ रुग्णवाहिका आहेत. त्यापैकी ८ रुग्णवाहिका कोविड कामात लावण्यात आल्या आहेत, तर ७ रुग्णवाहिका इतर ...
गोंदिया जिल्ह्यात १०८च्या एकूण १५ रुग्णवाहिका आहेत. त्यापैकी ८ रुग्णवाहिका कोविड कामात लावण्यात आल्या आहेत, तर ७ रुग्णवाहिका इतर रुग्णांसाठी लावण्यात आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याने प्रत्येक कोविड सेंटरकरिता प्रत्येकी एक रुग्णवाहिका खासगी, तर प्रत्येक तालुक्यात आणखी एक खासगी रुग्णवाहिका देण्यात आली आहे. कोविडचा संसर्ग पाहता ही व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात १०८ रुग्णवाहिकेसाठी शहरातील ६० टक्के लोकांचा फोन येतो, तर ग्रामीण भागातील ४० टक्के फोन येतात.
दिवसाकाठी ७५च्या घरात १०८ रुग्णवाहिकेसाठी फोन येत आहेत. जिल्ह्यात एकूण १०८ रुग्णवाहिकांची संख्या १५ आहे. या रुग्ण वाहिकांची सेवा घेण्यासाठी दररोज केंद्राकडे ७० ते ८० कॉल येत आहेत. एकट्या शहरातून ५० च्यावर कॉल येत आहेत. त्यामुळे रुग्णवाहिकांची सेवा व्यस्त झाली आहे.