जिल्ह्यात ५०७ मुलांच्या आई-वडिलांचा कोरोनाने झाला मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:26 AM2021-05-31T04:26:06+5:302021-05-31T04:26:06+5:30

बॉक्स आई किंवा वडिलांचा मृत्यू झाला असल्यास अकराशे रुपयाची मदत कोरोनामुळे आई किंवा वडिलांचा किंवा दोघांचाही मृत्यू झाला असल्यास ...

Corona kills parents of 507 children in district | जिल्ह्यात ५०७ मुलांच्या आई-वडिलांचा कोरोनाने झाला मृत्यू

जिल्ह्यात ५०७ मुलांच्या आई-वडिलांचा कोरोनाने झाला मृत्यू

Next

बॉक्स

आई किंवा वडिलांचा मृत्यू झाला असल्यास अकराशे रुपयाची मदत

कोरोनामुळे आई किंवा वडिलांचा किंवा दोघांचाही मृत्यू झाला असल्यास अशा बालकांना महिला व बालविकास विभागाच्या बालसंगोपन योजनेतून मदत करण्यात येणार आहे. या योजनेतून अकराशे रुपयांची मदत केली जाणार आहे. शून्य ते अठरा वर्षांपर्यंतच्या बालकांनाच मदत दिली जाणार आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने ही रक्कम थेट एकल पालकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

बॉक्स

या अनाथ मुलांचे सरकार काय करणार

कोरोनामध्ये अनाथ झालेल्या बालकांचा शोध जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या वतीने घेतला जात आहे. त्यातून अनाथ आढळणाऱ्या मुलांची संपूर्ण कौटुंबीक माहिती एकत्रित करण्यात येत आहे. सांभाळ करणारे कोणीही नाहीत, अशी परिस्थिती असल्यास त्या बालकास बालसमितीच्या माध्यमातून बालगृह, बालकाश्रमात ठेवण्यात येईल.

कोट

प्रशासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील पालक गमावलेल्या मुलांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत ५०७ बालकांचा शोध घेण्यात आला. त्यांना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातर्फे सर्वतोपरी शासनाची मदत करण्याचा मानस आहे. जिल्ह्यात अशी आणखी काही बालके आहेत का याचाही आम्ही शोध घेत आहोत. कोरोनामुळे एक पालक किंवा दोन्ही पालकांचे छत्र हरपलेली बालके कुटुंबात किंवा नातलगांकडे सुरक्षित आहेत, अशा बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येईल.

विजय नंदागवळी,

जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, भंडारा

Web Title: Corona kills parents of 507 children in district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.