जिल्ह्यात कोरोनाने तिघांचा मृत्यू, १३८ नव्या रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 05:00 AM2020-09-06T05:00:00+5:302020-09-06T05:00:00+5:30
शनिवारी १३८ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून त्यात भंडारा ८८, मोहाडी १८, लाखनी १६, पवनी ७, तुमसर ६ आणि लाखांदूर तालुक्यातील तीन रुग्णांचा समावेश आहे. भंडारा तालुक्यात ९२६ रुग्ण झाले असून त्यातील सर्वाधिक रुग्ण भंडारा शहरातील आहेत. साकोली तालुक्यात आतापर्यंत ११४, मोहाडी २६०, लाखनी १८२, तुमसर १९२? पवनी ११४, लाखांदूर ६० रुग्णांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दिवसेंदिवस कोरोना संसर्गात वाढ होत असून शनिवारी जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला असून १३८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या १८८४ वर पोहचली असून ३३ जण आतापर्यंत कोरोनाने मृत्यू पावले आहेत.
ऑगस्ट महिन्यापासून रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. गत तीन दिवसांपासून तर १०० च्या वर रुग्ण येत आहेत. शनिवारी १३८ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून त्यात भंडारा ८८, मोहाडी १८, लाखनी १६, पवनी ७, तुमसर ६ आणि लाखांदूर तालुक्यातील तीन रुग्णांचा समावेश आहे. भंडारा तालुक्यात ९२६ रुग्ण झाले असून त्यातील सर्वाधिक रुग्ण भंडारा शहरातील आहेत. साकोली तालुक्यात आतापर्यंत ११४, मोहाडी २६०, लाखनी १८२, तुमसर १९२? पवनी ११४, लाखांदूर ६० रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात १८८४ रुग्णांपैकी ९२७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून ९१४ व्यक्ती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात उपचार घेत आहेत.
भंडारा तालुक्यातील एक आणि तुमसर तालुक्यातील दोन व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. तिघेही भंडाराच्या आयसोलेशन कोविड आयसीयु वॉर्डात उपचार घेत होते. आता मृतांची संख्या ३३ वर पोहचली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. मात्र कोरोना रुग्णांची संख्या कमी व्हायचे नाव घेत नाही. गत तीन दिवसांपासून दररोज शंभरच्यावर रुग्ण येत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
जिल्ह्यात अॅन्टीजेन टेस्ट कीट द्वारे कोरोना रुग्णांची अलिकडे तपासणी केली जात आहे. १२ हजार ६४९ व्यक्तींचे नमूने आतापर्यंत अॅन्टीजेन कीटद्वारे तपासण्यात आले. त्यात १२०३ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अॅन्टीजेन कीट टेस्टमुळे रुग्णांची संख्या वाढत असून नागरिक आता स्वयंप्रेरणेने ही टेस्ट करून घेत असल्याचे दिसत आहे.