भंडारा तालुक्यातील तरुणाचा कोरोनाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:56 AM2021-01-08T05:56:05+5:302021-01-08T05:56:05+5:30
गुरुवारी ५३८ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यात भंडारा तालुक्यातील १८, मोहाडी ९, तुमसर ६, लाखनी ...
गुरुवारी ५३८ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यात भंडारा तालुक्यातील १८, मोहाडी ९, तुमसर ६, लाखनी १०, साकोली २ आणि लाखांदूर तालुक्यातील एक व्यक्ती कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत तर १७ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ७ हजार ७२१ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यात १२ हजार ६६५ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. त्यात भंडारा तालुक्यातील ५२३०, मोहाडी ९९१, तुमसर १५३७, पवनी १२४०, लाखनी १३७६, साकोली १६५० आणि लाखांदूर तालुक्यातील ६४१ व्यक्तींचा समावेश आहे.
जिल्ह्यात चाचणी झालेल्या रुग्णांच्या तुलनेत कोरोना पाॅझिटिव्ह निघण्याचे प्रमाण ११.८ टक्के आहे. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यात हे प्रमाण सर्वाधिक हे प्रमाण १४.८ होते. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात १२.६, नोव्हेंबर महिन्यात ११.६ आणि डिसेंबर महिन्यात ९.५ टक्के प्रमाण आढळून आले. १ ते ७ जानेवारीपर्यंत २६९३ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून त्यात ३१० व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले. कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसून येत आहे.