रविवारी जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा निरंक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:22 AM2021-07-12T04:22:57+5:302021-07-12T04:22:57+5:30
भंडारा : जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या निरंक आली आहे. रविवारी एकूण ८३६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ...
भंडारा : जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या निरंक आली आहे. रविवारी एकूण ८३६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी कुणीही पाॅझिटिव्ह आढळलेला नाही.
जिल्ह्यात आतापर्यंत ४९ हजार ४९२ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले आहेत. तसेच ५८ हजार ३५४ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आता फक्त आठ सक्रिय रुग्ण असून रविवारी एकाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
आतापर्यंत ४ लक्ष २४ हजार २४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी इत्यादी रुग्ण आढळणारे चाचणी करून घेत आहेत. मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह येत आहे. कोरोनाने आतापर्यंत ११३० जणांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णसंख्येत भंडारा, तुमसर, पवनी तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण तर लाखनी तालुक्यात दोन तर साकोली तालुक्यात तीन रुग्ण पाॅझिटिव्ह आहेत.
बरे झालेल्या रुग्णसंख्येवर नजर टाकल्यास भंडारा तालुक्यात २४ हजार २२८, मोहाडी ४ हजार २६९, तुमसर ७ हजार ६, पवनी ५ हजार ९१२, लाखनी ६ हजार ४५९, साकोली ७ हजार ५९० तर लाखांदूर तालुक्यात २ हजार ८९० व्यक्ती बरे झालेले आहेत.