पाच तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या निरंक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:13 AM2021-08-02T04:13:25+5:302021-08-02T04:13:25+5:30
भंडारा जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडाला होता. दररोज १२०० ते १४०० रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे रुग्णालयात मोठी ...
भंडारा जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडाला होता. दररोज १२०० ते १४०० रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. ऑक्सिजन बेड मिळणे कठीण झाले होते. अशा स्थितीत आता जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना संसर्गाची लाट ओसरु लागली. जुलै महिन्यात तर कुणाचाही मृत्यू झाला नाही. सुमारे १५ दिवस रुग्णसंख्या निरंक आली. १ ऑगस्ट रोजी ५३३ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात कुणीही पाॅझिटिव्ह आढळून आले नाही. सध्या जिल्ह्यात चार ॲक्टिव्ह रुग्ण असून भंडारा तालुक्यात तीन आणि मोहाडी तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. तुमसर, पवनी, लाखनी, साकोली आणि लाखांदूर तालुक्यात एकही ॲक्टिव्ह रुग्ण नाही.
बाॅक्स
५८ हजार ६७२ व्यक्तींची कोरोनावर मात
जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ३७ हजार ३१३ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ५९ हजार ८०८ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. त्यापैकी ५८ हजार ६७२ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली तर ११३२ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला. जिल्ह्याचा मृत्युदर १.८९ टक्के आहे.