कोरोना। डेंग्यूची लक्षणे सारखीच, तातडीने करून घ्या चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:21 AM2021-07-24T04:21:28+5:302021-07-24T04:21:28+5:30

भंडारा : कोरोना संसर्ग काळात अन्य आजार नाहीत काय? असे जाणवायला लागले होते. मात्र कोरोना रुग्णांमध्ये जी लक्षणे दिसून ...

Corona. Similar to the symptoms of dengue, get tested immediately | कोरोना। डेंग्यूची लक्षणे सारखीच, तातडीने करून घ्या चाचणी

कोरोना। डेंग्यूची लक्षणे सारखीच, तातडीने करून घ्या चाचणी

Next

भंडारा : कोरोना संसर्ग काळात अन्य आजार नाहीत काय? असे जाणवायला लागले होते. मात्र कोरोना रुग्णांमध्ये जी लक्षणे दिसून येतात ती लक्षणे अन्य आजारांमध्येही दिसून येतात. डेंग्यूची लक्षणे ही कोरोना रुग्णांमध्ये आढळणाऱ्या लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळे अंगावर दुखणे काढण्यापेक्षा तातडीने चाचणी करून घ्यावी, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत.

बॉक्स

ताप, डोकेदुखी, मळमळ

डेंग्यूच्या लक्षणांमध्ये अचानक ताप येणे, तीव्र डोकेदुखी, मळमळ, डोळ्यांच्या मागे वेदना होणे, सांधेदुखी होणे, अति थकवा, शारीरिक वेदना होणे, भूक हरवणे आणि त्वचेवर पुरळ येणे यांचा समावेश होतो. कोरोनामध्येही अशीच काही लक्षणे आढळून येतात.

बॉक्स

पाणी उकळून प्या, डासांपासून सावध राहा

डेंग्यू ताप असलेल्या रुग्णांनी पुरेशी विश्रांती घ्यावी, शक्यतोवर पाणी उकळून प्यावे, फळांचा रस किंवा द्रवपदार्थ घेण्यात सक्षम असतील तर ओआरएस घ्यावे, थकवा आणि अशक्तपणा आणणाऱ्या शारीरिक क्रिया टाळाव्यात, अन्य संसर्ग काढण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी केलेल्या मच्छरदाणीचा वापर करावा, याशिवाय परिसरात स्वच्छता ठेवावी.

कोट बॉक्स

डेंग्यू तापात आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे. मात्र त्याला घाबरून जाऊ नये. पुरेशा प्रमाणात द्रव्य घ्यावेत जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता येणार नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही औषधे घेऊ नयेत.

डॉ. निखिल डोकरीमारे, आरएमओ, बाह्य विभाग, जिल्हा रुग्णालय भंडारा

Web Title: Corona. Similar to the symptoms of dengue, get tested immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.