कोरोना, मोबाईलवेडाने उडविली झोप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:24 AM2021-06-29T04:24:18+5:302021-06-29T04:24:18+5:30

भंडारा : वाढत्या आधुनिकीकरणासोबतच मानवीय जीवनशैलीत अमूलाग्र बदल घडून आला आहे. त्यातच कोरोना महामारीने भर घातली. याशिवाय मोबाईलच्या ...

Corona, sleep deprived by MobileVeda! | कोरोना, मोबाईलवेडाने उडविली झोप !

कोरोना, मोबाईलवेडाने उडविली झोप !

Next

भंडारा : वाढत्या आधुनिकीकरणासोबतच मानवीय जीवनशैलीत अमूलाग्र बदल घडून आला आहे. त्यातच कोरोना महामारीने भर घातली. याशिवाय मोबाईलच्या अती वापराने मानवीय मनावर चांगलाच परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे झोपेची समस्या उद्‌भवत आहे. याबाबत वेळीच काळजी घेऊन दैनंदिन कामकाजाबाबत आखणी करणे गरजेचे बनले आहे.

गत दीड वर्षापासून कोरोनामुळे सर्वच त्रस्त बनले आहेत. यातच सोशल मीडियाचा वापर जास्त झाल्याने मोबाईलचा वापरही वाढला आहे. रात्री-बेरात्री मोबाईल पाहण्याचा व वापरण्याचा परिणाम मानवीय शरीरावर बघायला मिळत आहे. झोप पूर्ण होत नसल्याने विस्मरण, स्वभावामध्ये बदल, रोगप्रतिकार क्षमता कमी होणे, मधुमेहाची समस्या निर्माण होणे, शारीरिक असमतोलपणा निर्माण होणे, हृदयविकाराला कारणीभूत ठरणे, वजन कमी होणे, उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवणे आदी बाबी झोप पूर्ण न झाल्याने होऊ शकतात. मात्र या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामत: अनेकांना हा निद्रानाशाचा त्रास जाणवत असून त्याचा एकूण परिणाम आरोग्यावर होत आहे.

कोरोना आणि मोबाईलच्या जास्त वापरामुळे झोप कमी होत असल्याचे सर्वेक्षणाअंती समोर आले आहे. यावर काळजी घेणे नितांत महत्त्वाचे आहे.

बॉक्स

झोप का उडते...

आधुनिकीकरणात जीवनशैली बदलून गेली आहे. कामाचा ताण, विचारांचा अतिरेक व अन्य कारणांमुळे झोप उडत असते. याला विविध कारणेही अभिप्रेत असतात. याशिवाय शारीरिक व्याधींमुळेही झोप लागत नाही. अशावेळी औषधोपचार करावा.

बॉक्स

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची गोळी नको

एखाद्या व्यक्तीला झोप लागत नसेल, शारीरिक व्याधी असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची गोळी घेऊ नये. साधारणत: झोप लागत नसेल तर गोळी घेऊ शकता. मात्र अन्य कारण असेल तर उपचाराला प्राथमिकता द्यावी.

कोट

अकारण चिंता, अतिरिक्त काळजी घेणे, क्षमतेपेक्षा जास्त काळ मोबाईल पाहणे, खानपाण्याची सवय बदलणे यामुळे झोप लागत नाही. यावर उपाय म्हणून ठरलेल्या वेळेत झोप पूर् करण्याचा प्रयत्न करावा.

- डॉ. अमित कावळे, भंडारा

कोट

झोप पूर्ण न झाल्याने त्याचा शरीरावर विपरित परिणाम होतो. मेंदूला त्याचे कार्य करण्यासाठी रेस्ट अवरची गरज असते. त्यामुळे झोप पूर्ण झाली पाहिजे. यामुळे बहुतांश मानसिक तणाव दूर होतो. कोरोना काळात मानसिक व शारीरिक व्याधी उत्पन्न झाल्याची उदाहरणे आहेत.

- डॉ. रत्नाकर बांडेबुचे, मानसोपचार तज्ज्ञ, भंडारा

Web Title: Corona, sleep deprived by MobileVeda!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.