कोरोना लसीकरणात ‘हेल्थ केअर वर्कर’ ठरले अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:00 AM2021-02-18T05:00:00+5:302021-02-18T05:00:51+5:30

भंडारा जिल्ह्यात १५ हजार १७० कर्मचाऱ्यांची लसीकरण अंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे. यात पहिल्या टप्प्यात आठ हजार ७९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. त्यात सर्वात आघाडीवर हेल्थकेअर वर्कर असून त्यांची संख्या ७,२९७  इतकी नोंदणी असून त्यापैकी पाच हजार ७५६ वर्कर्सना लस देण्यात आली आहे.

Corona Vaccination Leads Health Care Workers | कोरोना लसीकरणात ‘हेल्थ केअर वर्कर’ ठरले अव्वल

कोरोना लसीकरणात ‘हेल्थ केअर वर्कर’ ठरले अव्वल

Next
ठळक मुद्देदुसरा टप्पा सुरू : प्रत्यक्ष व पथनाट्यातून कोरोनाची जनजागृती

इंद्रपाल कटकवार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :  कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर काविड १९ लसीकरण मोहीम जिल्हाभर सुरू करण्यात आली. यात दुसरी फेरीही सुरू झाली असून पहिल्या फेरीत हेल्थकेअर वर्कर कोरोना लस घेण्यात आघाडीवर आहेत. 
भंडारा जिल्ह्यात १५ हजार १७० कर्मचाऱ्यांची लसीकरण अंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे. यात पहिल्या टप्प्यात आठ हजार ७९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. त्यात सर्वात आघाडीवर हेल्थकेअर वर्कर असून त्यांची संख्या ७,२९७  इतकी नोंदणी असून त्यापैकी पाच हजार ७५६ वर्कर्सना लस देण्यात आली आहे.  जिल्ह्यातील ९८९ आशा वर्कर, २९१ पोलीस कर्मचारी, ३९१ होमगार्ड, कारागृहमधील ३१ कर्मचारी, कोब्रा बटालियन येथील १४० जवान, नगरपालिकेतील ३८८ कर्मचारी, महसूल विभागातील ९५ तर पंचायत राज विभागातील दोन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहेत.
दुसऱ्या टप्प्यात अंतर्गत ८ हजार ७९ लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे. लसीकरण हे शासकीय सुट्टी व रविवार ला वगळून करण्यात येत आहे लाभार्थ्याला लस दिल्यानंतर दुसरा रोज २८ दिवस पूर्ण झाल्यावर देणे अपेक्षित आहे.

कोरोना लसीकरणासाठी सर्वच विभागातील कर्मचारी तत्पर दिसून आले. लसीकरण सुरक्षित असून कोणालाही घाबरण्याचे कारण नाही असे आधीच राज्य शासनाने सांगितले आहे. याची प्रचीतीही मोहिमेत दिसून येत आहे.

भंडारा जिल्ह्यात नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांना पैकी कुणीही लस का घेऊ नये असा सवाल उपस्थित केला नाही. सर्वांनी लसीकरणाबाबत पुढाकार दाखविला आहे. यासाठी जिल्हा आरोग्य विभागाची तत्परता कारणीभूत ठरली.

जिल्हाधिकारी यांच्यासह आरोग्य प्रशासनाने टप्प्याटप्याने जनजागृती करण्यावर भर दिला. आता कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पाही सुरू झाला आहे. यातही सर्वच हिरीरीने सहभाग नोंदवित आहे.

 

Web Title: Corona Vaccination Leads Health Care Workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.