चान्ना पीएचसी अंतर्गत कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:33 AM2021-04-13T04:33:58+5:302021-04-13T04:33:58+5:30
बोंडगावदेवी : प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना-बाक्टी अंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्रातील ठिकठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा धडक कार्यक्रम राबविला जात आहे. ...
बोंडगावदेवी : प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना-बाक्टी अंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्रातील ठिकठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा धडक कार्यक्रम राबविला जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुळकर्णी आपल्या आरोग्य पथकाच्या सहकार्याने परिसरात मिशन कोविड लसीकरण राबवित आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर आळा बसावा म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्रात कोरोना चाचणी अभियान राबविण्यावर भर दिला जात आहे. कोरोना लसचा पुरवठा होताच शनिवारी (दि. १०) परिसरातील आरोग्य उपकेंद्र भिवखिडकी, बोंडगावदेवी व चान्ना-बाक्टी येथे मिशन कोविड लसीकरण राबविण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. आरोग्य उपकेंद्र भिवखिडकी येथे ८०, बोंडगावदेवी येथे ८०, तर प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना येेथे ४० अशा २०० नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. तसेच चान्ना येथे २७ जणांची कोरोना चाचणी केली असता त्यामध्ये बोंडगावदेवीचे पाचजण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याचे पीएचसीच्या वतीने सांगण्यात आले. परिसरात कोरोना आटोक्यात यावा तसेच प्रतिबंधात्मक कोरोना लसीकरण घेण्यासाठी डाॅ. कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात पीएचसीचे सर्व आरोग्य पथक सहकार्य करीत आहेत.