शासकीय रुग्णालयातच मिळते कोरोना लस, खासगीमध्ये बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:21 AM2021-07-23T04:21:58+5:302021-07-23T04:21:58+5:30

भंडारा : कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात आतापर्यंत ५ लक्ष २ हजार आठजणांनी लस घेतली आहे. सुरुवातीला खासगी ...

Corona vaccine is available only in government hospitals, closed in private | शासकीय रुग्णालयातच मिळते कोरोना लस, खासगीमध्ये बंद

शासकीय रुग्णालयातच मिळते कोरोना लस, खासगीमध्ये बंद

googlenewsNext

भंडारा : कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात आतापर्यंत ५ लक्ष २ हजार आठजणांनी लस घेतली आहे. सुरुवातीला खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरण होत होते, मात्र विद्यमान स्थितीत फक्त शासकीय रुग्णालय व त्याअंतर्गत येणाऱ्या केंद्रांमध्ये कोरोना लस उपलब्ध आहे. भंडारा जिल्ह्यात साडेनऊ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे. त्यापैकी आतापर्यंत दोन्ही डोसअंतर्गत ५ लक्ष २ हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे.

यात प्रथम डोस घेणाऱ्यांची संख्या ३ लक्ष ७५ हजार ८०० इतकी, तर द्वितीय डोस घेणाऱ्यांची संख्या १ लक्ष २६ हजार २०८ आहे. गुरुवारी तब्बल ४ हजार १५३ जणांनी लसीकरण करून घेतले. ९४ केंद्रांच्या माध्यमातून लसीकरण करण्यात येत आहे. यातही ४५ ते ५९ वयोगटातील लसीकरण अतिप्रमाणात झाल्याचे दिसून येते. त्यानंतर ६० वर्षे वयोगटावरील व्यक्तींनी लस घेतली आहे. १८ ते ४५ या वयोगटातील एक लक्ष ५८ हजार २१० जणांनी लस घेतली आहे.

कोट बॉक्स

रुग्णालयात जाऊन घेतली लस

जिल्हा रुग्णालयात प्रत्यक्षरित्या जाऊन मी कोविडची द्वितीय लस घेतली आहे. खासगी रुग्णालयातही लस आधी मिळत होती; मात्र मी पहिली पसंती शासकीय रुग्णालयात दिली.

- लीलाधर लांजे. लाभार्थी.

कोट बॉक्स

कोरोना लस अत्यंत सुरक्षित आहे. नागरिकांनी न घाबरता लसीकरण करावे. मी पण आरोग्यवर्धिनी केंद्रात जाऊन ऑफलाईन नोंदणी करून लस घेतली आहे.

-विद्या मते, लाभार्थी.

कोट बॉक्स

लस घेण्यासाठी पुढे या

कोरोनावर मात करायची असेल, तर लस हा एक रामबाण उपाय आहे. नागरिकांनी न घाबरता लसीकरणासाठी पुढे यावे.

- माधुरी माथुरकर, जिल्हा लसीकरण अधिकारी, भंडारा.

Web Title: Corona vaccine is available only in government hospitals, closed in private

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.