शाळांमध्ये झाली कोरोनाची एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:35 AM2021-03-20T04:35:05+5:302021-03-20T04:35:05+5:30
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतर शासनाने इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाचे नियम पाळत शाळा ...
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतर शासनाने इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाचे नियम पाळत शाळा सुरू होऊन आता पाच महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे. मात्र, मार्च महिन्यात पुन्हा कोरोना संसर्ग वाढीला सुरुवात झाली आहे. मागील तीन-चार दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच शाळांमध्येही कोरोनाने एन्ट्री केल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १, देवरी १, गोंदिया ९ आणि तिरोडा तालुक्यातील १ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सध्या विद्यार्थी आणि शिक्षण विभागातर्फे शिक्षक आणि विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. त्यात तपासणी दरम्यान विद्यार्थी कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे शाळांमध्येही खळबळ उडाली आहे. कोरोनाबाधित विद्यार्थी आढळलेल्या शाळांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.