भंडाऱ्यात कोरोनाचा दुसरा बळी; बाधितांची संख्या १७४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 07:06 PM2020-07-13T19:06:19+5:302020-07-13T19:06:44+5:30
भंडारा शहरातील एका ३३ वर्षीय तरूणाचा कोरोनाने उपचारादरम्यान सोमवारी नागपूर येथे मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरातील एका ३३ वर्षीय तरूणाचा कोरोनाने उपचारादरम्यान सोमवारी नागपूर येथे मृत्यू झाला. जिल्ह्यात सलग दुसºया दिवशी कोरोनाने मृत्यू झाला असून आता मृतांची संख्या दोन झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १७४ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहे.
भंडारा शहरातील एका ३३ वर्षीय तरूणाला ताप, खोकला आणि सदीर्मुळे एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती बिघडल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल केले. परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने रविवारी त्याला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा सोमवारी मृत्यू झाला. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार सदर तरूणाचा मृत्यू कोविड-१९ पॉझिटिव्ह, निमोनिया आणि तीव्र श्वासदाहाने झाल्याचे म्हटले आहे.
सोमवारी चार व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले असून ते सर्व भंडारा तालुक्यातील आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १७४ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहे. सलग दुसºया दिवशीही कोरोनाने मृत्यू झाल्याने भंडारा शहरात खळबळ उडाली आहे.