पवनी, लाखांदूर, साकोली, लाखनी, मोहाडी तालुक्याची कोरोनामुक्ती वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:33 AM2021-01-13T05:33:13+5:302021-01-13T05:33:13+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ९९३३ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये १२ हजार ८२६ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले. त्यात भंडारा ...

Coronation liberation march of Pawani, Lakhandur, Sakoli, Lakhni, Mohadi talukas | पवनी, लाखांदूर, साकोली, लाखनी, मोहाडी तालुक्याची कोरोनामुक्ती वाटचाल

पवनी, लाखांदूर, साकोली, लाखनी, मोहाडी तालुक्याची कोरोनामुक्ती वाटचाल

Next

जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ९९३३ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये १२ हजार ८२६ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले. त्यात भंडारा तालुक्यात ५३१२, मोहाडी १००६, तुमसर १५७२, पवनी १२४१, लाखनी १३९०, साकोली १६६२, लाखांदूर ६४३ रुग्णांचा समावेश आहे. यापैकी १२ हजार ८२६ व्यक्ती कोरोना मुक्त झाले आहेत. सध्या ३७५ व्यक्तींवर कोरोना उपचार सुरू आहे. तपासणीच्या तुलनेत पॉझिटिव्ह निघण्याचे सध्याचे प्रमाण ९.६ टक्के आहे. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यात तपासणीच्या तुलनेत रुग्णांचे प्रमाण १४.८ टक्यांपर्यंत पोहचले होते. मार्च महिन्यात एकही रुग्ण आढळून आला नव्हता. एप्रिल महिन्यात एक रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत गेली. परंतु सुरुवातीपासूनच कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले.

बॉक्स

ॲन्टिजेन चाचणीत आढळले ९६१६ रुग्ण

भंडारा जिल्ह्यात ८८ हजार ९७३ रुग्णांची ॲन्टिजेन चाचणी करण्यात आली. त्यात ९६१६ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. आरटीपीसीआर अंतर्गत २०६७४ व्यक्तींची चाचणी केली. त्यात ३०८७ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

Web Title: Coronation liberation march of Pawani, Lakhandur, Sakoli, Lakhni, Mohadi talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.