त्या भ्रष्टाचार प्रकरणी गटसचिवाला मागितला खुलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:42 AM2021-09-10T04:42:50+5:302021-09-10T04:42:50+5:30
२०१९ - २० मध्ये तालुक्यातील मोहरणा येथील सेवा सहकारी संस्थेअंतर्गत आवार भिंतीचे बांधकाम, नियमबाह्य इमारत फंडाची वसुली व वसूल ...
२०१९ - २० मध्ये तालुक्यातील मोहरणा येथील सेवा सहकारी संस्थेअंतर्गत आवार भिंतीचे बांधकाम, नियमबाह्य इमारत फंडाची वसुली व वसूल रकमेची अफरातफर यासह बेकायदेशीररीत्या सचिवाचे मानधनात केलेली वाढ आदी गंभीर आरोप करुन लेखापरीक्षणात संस्थेअंतर्गत भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यात आला होता. याप्रकरणी मोहरणा येथील काही नागरिकांनी गत ३० ऑगस्ट रोजी लाखांदूर येथील सहायक निबंधकांना तक्रार करुन गटसचिवाविरोधात फौजदारी कारवाईची मागणी केली होती. ही कारवाई पुढील १५ दिवसात न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. दरम्यान, या तक्रारीची दखल घेत लाखांदूर येथील सहायक नबंधक संजय सुरदुसे यांनी गटसचिवाला खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहे.
बॉक्स
गटसचिवाकडून दोषदुरुस्तीचा कांगावा
मोहरणा येथील सेवा सहकारी संस्थेचे लेखा परीक्षण डी. आर. अन्नापूर्णे नामक लेखा परीक्षकांनी केले होते. या लेखा परीक्षणात लेखा परीक्षकांनी संस्थेअंतर्गत विविध कामात दोष नोंदविले आहेत. दोषांची येथील गटसचिवांकडून दोषदुरुस्ती केल्याचा कांगावा केला जात असला तरी दोष दुरुस्ती अहवालात अर्ध्याहुन अधिक दोष कायमच असल्याने गावकऱ्यांच्या तक्रार प्रकरणी सहायक निबंधक काय कारवाई करतात, याकडे आता नजरा लागल्या आहेत.