मोहरणा येथील सेवा सहकारी संस्थेत भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:37 AM2021-09-03T04:37:16+5:302021-09-03T04:37:16+5:30

२०१९-२० या कालावधीत तालुक्यातील मोहरणा येथील सेवा सहकारी संस्थेचे लेखापरीक्षण करण्यात आले. या लेखापरीक्षणात संस्थेअंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या आवार ...

Corruption in Seva Sahakari Sanstha at Moharna | मोहरणा येथील सेवा सहकारी संस्थेत भ्रष्टाचार

मोहरणा येथील सेवा सहकारी संस्थेत भ्रष्टाचार

Next

२०१९-२० या कालावधीत तालुक्यातील मोहरणा येथील सेवा सहकारी संस्थेचे लेखापरीक्षण करण्यात आले. या लेखापरीक्षणात संस्थेअंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या आवार भिंतीच्या खर्चाची रक्कम अदा करण्यात आली असताना या बांधकामाचे अंदाजपत्रक गहाळ असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तथापि, येथील संस्था सचिवाने स्वमर्जीने संस्थेअंतर्गत सचिवाला सात हजार रुपयाचे मानधन ठरविले असताना संबंधित मानधनात परस्पर वाढ करून अध्यक्षाच्या स्वाक्षरीविना प्रति महिना १० हजार रुपये मानधन उचल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मानधनातील वाढ ही बेकायदेशीर व नियमबाह्य असून जिल्हा उपनिबंधकाच्या निर्देशाचे उल्लंघन असल्याचा ठपका लेखापरीक्षण अहवालात ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, संस्थेच्या ठरावानुसार कर्जदार शेतकऱ्यांकडून ईमारत फंडासाठी आवश्यक निधी जमा करीत असताना संस्थेतील पदाधिकारी व सचिवाने बेकायदेशीररित्या या फंडाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या संबंध गैरप्रकारात तालुक्यातील मोहरणा येथील सेवा सहकारी संस्था पदाधिकारी व प्रामुख्याने सचिवाला लेखापरीक्षण अहवालात दोषी ठरविण्यात आल्याने गावकऱ्यांनी संबंधितांचे विरोधात फौजदारी कारवाईची मागणी मुरली बगमारे, नरेश राऊत, श्रीधर राऊत, लोकमान राऊत, भीमराव तांडे, मुरारी पिलारे, सरपंच प्रभाकर मेंढे, विठोबा राऊत, विलास गायकवाड, गोविंदा कुत्तरमारे, खुशाल पिलारे, जयपाल कुत्तरमारे, सुधाकर रासेकर, गौराबाई बगमारे, राकेश राऊत, संदीप राऊत, सुरेखा राऊत, ताराचंद राऊत, प्रल्हाद वकेकार, गजानन तुपटे, निशा बगमारे, विठोबा वकेकार, घनश्याम राऊत, यशवंत बगमारे आदींनी केली आहे.

बॉक्स

तक्रारीची चौकशी करून कार्यवाही करणार

लेखापरीक्षण अहवालात मोहरणा येथील सेवा सहकारी संस्थे अंतर्गत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपाखाली गावकऱ्यांनी फौजदारी कारवाईची मागणी केली आहे. या मागणीनुसार गावकऱ्यांच्या तक्रारी अंतर्गत चौकशी करून आवश्यक कार्यवाही केली जाणार असल्याचे मत लाखांदूरचे सहाय्यक निबंधक सुरदुसे यांनी सांगितले.

020921\1536-img-20210902-wa0026.jpg

मोहरणा येथील सेवा सहकारी संस्थेची ईमारत

Web Title: Corruption in Seva Sahakari Sanstha at Moharna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.