‘म्यूकरमायकोसिस’ आजारावरील खर्च जातोय 4 ते 12 लाखांपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 05:00 AM2021-05-23T05:00:00+5:302021-05-23T05:00:45+5:30

या आजाराला ‘झिगॉमायकोसिस’ म्हणून  ओळखले जाते. एखाद्या आजारपणामुळे  रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली असेल तर हे संक्रमण बहुतेक वेळा उदभवते. उच्च रक्तदाब, अनियंत्रित मधुमेह, अवयव प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तींमध्ये याचे गंभीर स्वरुप पहावयास मिळते. याकरिता उपचार घेणे महत्वाचे आहे. उपचार न घेतल्यास म्यूकरमायकोसिस प्राणघातकही ठरू शकतो.

The cost of mucorrhoea is between Rs 4 lakh and Rs 12 lakh | ‘म्यूकरमायकोसिस’ आजारावरील खर्च जातोय 4 ते 12 लाखांपर्यंत

‘म्यूकरमायकोसिस’ आजारावरील खर्च जातोय 4 ते 12 लाखांपर्यंत

Next
ठळक मुद्दे खर्च आवाक्याबाहेर : जिल्ह्यात आतापर्यंत आढळले चार रूग्ण, बचाव हाच उपाय

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :  म्यूकरमायकोसिस हा एक प्रकारचा बुरशीजन्य संसर्ग आहे. हा तुलनेने दुर्मिळ आहे, परंतु अत्यंत गंभीर देखील आहे. शासकीय रूग्णालयात यावर उपचार नि:शुल्क आहे, मात्र खासगीय उपचार करणे म्हणजे आवाक्याबहेरबी बाब ठरत असल्याचे दिसून येत आहे. साधारणत: यावर ४ ते १२ लाख रूपयांपर्यंत खर्च होवू शकतो, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.
जिल्ह्यात सध्या म्यूकरमायकोसिस चे ४ रूग्ण आढळले आहेत. ययापैकी २ रूग्णांवर जिल्हा सामान्य रूग्णालयात तर उर्वरीत दोन रूग्णांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
या आजाराला ‘झिगॉमायकोसिस’ म्हणून  ओळखले जाते. एखाद्या आजारपणामुळे  रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली असेल तर हे संक्रमण बहुतेक वेळा उदभवते. उच्च रक्तदाब, अनियंत्रित मधुमेह, अवयव प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तींमध्ये याचे गंभीर स्वरुप पहावयास मिळते. याकरिता उपचार घेणे महत्वाचे आहे. उपचार न घेतल्यास म्यूकरमायकोसिस प्राणघातकही ठरू शकतो.
म्यूकरमायकोसिस संक्रमित होणारा आजार नाही. म्हणून संक्रमित व्यक्तीकडून तो आजार दुसऱ्या व्यक्तीला होवू शकत नाही. मात्र या प्रकारच्या संसर्गापासून बचाव करण्याचा उत्तम उपाय म्हणजे स्वतःची काळजी घेणे, वैयक्तिक स्वच्छतेकडे काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. 
आपली प्रतिकारशक्ती दुर्बल असल्यास, घराबाहेर स्वत:ला सुरक्षित ठेवणे महत्वाचे आहे. कोणत्याही ठिकाणी काम करताना मास्क घातल्यास आणि पूर्ण बरे होईपर्यंत सर्व जखमांवर नियमित मलमपट्टी करीत राहिल्यास बुरशीजन्य संसर्ग रोखणे शक्य होईल. 
उन्हाळ्यात आणि शरद ऋतूतील महिन्यांमध्ये अतिरिक्त सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, कारण या वातावरणात बुरशीचे प्रमाण वाढण्याची शक्यता अधिक असते. म्यूकरमायकोसिस या आजाराची  माहिती आपल्या सर्वांना उपयुक्त ठरेल यात शंका नाही. प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक झाले आहे.  वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.  लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.  लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा  सल्ला घेणे गरजेचे आहे.

काय आहे उपाय

 वेळीच निदान आणि उपचार केल्यामुळे या आजारामुळे होणारे संभाव्य दुष्परिणाम टाळता येतात. यासाठी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. कोरोनाच्या उपचारादरम्यान स्टेरॉईडचा आवश्यक तेवढाच वापर गरजेचा असून अतिरिक्त वापर टाळणे अत्यावश्यक. प्रतिजैविकांचा (ॲटींबायोटिक्स)  तारतम्याने वापर आवश्यक आहे.  उपचारांतर्गत अँटी फंगल ट्रीटमेंटची गरज असेल तर सर्जरी करुन बाधित झालेला भाग काढून टाकला जातो. यासाठी दंत शल्य चिकित्सक, ओरल आणि मॅकझिलोफ़ेशियल सर्जन, कान-नाक-घसा तज्ञ, न्यूरोसर्जन व फिजिशियन यांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.
 

म्युकरमायकाेसिस आजाराचे जिल्ह्यात चार रुग्ण आढळले आहेत. यापैकी दाेन रुग्णांवर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नियमाप्रमाणे रुग्णांना औषधाेपचार केला जात असून यावर आवश्यक असलेले इंजेक्शन जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहेत. आपात सुविधांसाठीही रुग्णालय सज्ज आहे. म्युकरमायकाेसिस आजाराची लक्षणे लक्षात येताच त्वरित डाॅक्टरांचा सल्ला घेवून औषधाेपचार सुरु करावा.
- डॉ. निखील डोकरीमारे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक, भंडारा

म्यूकरमायकोसिसची अशी आहेत लक्षणे  

म्यूकरमायकोसिस हा आजार म्यूकोर्मिटाईड मोल्ड्सच्या संपर्कातून उदभवतो. हे जीव पाने, कंपोस्टचे ढीग, माती, सडणारे लाकूडयात आढळतात. हे प्रभावित श्वसन यंत्रणेस संसर्गित करते व त्यातून म्यूकरमायकोसिस आजार उदभवतो. याला फुफ्फुसीय संसर्ग  म्हणून संबोधले जाते.
यात प्रामुख्याने खोकला, ताप येणे, डोकेदुखी, नाक बंद, सायनस वेदना दातांमधे तीव्र वेदना, दात हलणे, हिरड्यांमधून पू येणे, तोंडातून दुर्गंधी येणे, टाळूवर एखादा काळा चटटा येणे, नाकातून पू येणे, दृष्टी कमी होणे, डोळे लाल होणे, चेहऱ्यावर सूज येणे वा बधीरता येणे, जबड्याचे हाड उघडे पडणे, त्वचा काळसर होणे त्वचेवर मेदयुक्त फोड व लालसरपणा येणे, शरीराला सूज येणे अशी लक्षणे आहेत. 
अल्सर या आजारामुळे प्रसंगी वरचा डोळा व जबडा गमवायची वेळ येऊ शकते. तसेच मेंदूपर्यंत संसर्ग पोहोचल्यास प्रसंगी मृत्यूही संभावतो. यावर ‘ॲम्फोटेरीसीन बी‘ हे इंजेक्शन प्रभावी असून ते महागडे पण आहे.

 

Web Title: The cost of mucorrhoea is between Rs 4 lakh and Rs 12 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.