दोन कोटींच्या खर्चानंतरही रस्ता ठरला कुचकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:30 PM2019-07-16T23:30:44+5:302019-07-16T23:31:26+5:30
खमारी ते बेलगाव रस्ता यंत्रणांच्या साठगाठीचा बळी ठरला आहे. दोन वर्षांपासून २ कोटींचा निधी मंजूर असताना तो खर्च करून रस्त्याचे बांधकाम पूर्ण केल्यानंतरही यंत्रणा कुचकामी ठरली आहे. पावसाळ्या अगोदर सदर रस्त्याचे बीबीएम करण्यात आले. परंतू कारपेट न झाल्याने रस्ता उखडला तर चिखलामुळे वाहनांचे अपघात वाढले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : खमारी ते बेलगाव रस्ता यंत्रणांच्या साठगाठीचा बळी ठरला आहे. दोन वर्षांपासून २ कोटींचा निधी मंजूर असताना तो खर्च करून रस्त्याचे बांधकाम पूर्ण केल्यानंतरही यंत्रणा कुचकामी ठरली आहे. पावसाळ्या अगोदर सदर रस्त्याचे बीबीएम करण्यात आले. परंतू कारपेट न झाल्याने रस्ता उखडला तर चिखलामुळे वाहनांचे अपघात वाढले आहेत.
भिलेवाडा ते मांडवी रस्ता मृत्यूमार्ग म्हणून ओळखला जातो. खोल खड्ड्यांची संख्या तर बांधकाम विभागालाही मोजता येणार नाहीत. ऐवढी आहेत. रस्त्याच हाल बेहाल आहेत. याला रस्ता म्हणावा की चिखलाने माखलेला मृत्यू मार्ग हे आता बांधकाम विभागानेच सांगण्याची गरज आहे. मागील वर्षी या निधीतून खडकी ते ढिवरवाडा ५ कि़मी.चा मार्ग तयार करण्यात आला. मात्र, वर्षभरातच मार्ग अनेक ठिकाणी उखडला आहे. ओरड वाढल्याने यावर्षी पावसाळ्याच्या तोंडावर उर्वरित निधीतून बेलगाव ते खमारी पर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम हाती घेण्यात आले. मात्र, कारपेट न करता बीबीएम करून कंत्राटदाराला मोकळे सोडण्यात आले. बीबीएम झालेल्या रस्त्यावर आज अनेक ठिकाणी खोल खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या कडांची पार ऐसीतैसी झाली आहे. परंतू विभागाने बांधकाम पूर्ण करून घेण्याचे धाडस दाखविले नाही. चिखलाने माखलेल्या रस्त्यावर वाहनचालकांना मरणास मोकळे सोडले आहे. यंत्रणांच्या साठगाठीचा परिणाम आज सर्वांना भोगावा लागतो आहे. प्रकरणी वरिष्ठ स्तरावर चौकशी मागणी होत आहे.
दोन वर्षापूर्वी मिळाला ३ कोटींचा निधी
रस्त्याच्या दुरूस्तीसाठी मागील ५ वर्षापासून ओरड असताना दोन वर्षांपुर्वी भिलेवाडा ते खडकी मार्गासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून ३ कोटी रूपये मंजूर झाले. मात्र, रस्त्याचे बांधकाम पूर्ण करून निधी दोन वर्षांतही बांधकाम विभागाला खर्च करता आला नाही. या मार्गावरील वाहतुकदारांचे दुदैव आहे.
अनेकांना गमवावा लागला जीव
या रस्त्यावर मागील वेळी मंडणगाव येथील दोन सख्या बहिणींना तर बेरोडी जवळ दुचाकीस्वाराला अपघातात जीव गमवावा लागला. गंभीर व किरकोळ जखमी झालेल्यांचे प्रमाण मोठे आहे. या रस्त्याच्या कडा फुटभर खोल आहेत. आडव्या नाल्या व कडेला पाणी साचून राहत असल्याने वाहने कडेला घेता येत नाही. चिखलात वाहन घसरून अपघात होत आहेत.