Maharashtra Grampanchayat Election; भंडारा जिल्ह्यात मतमोजणीला प्रारंभ; काँग्रेसचा झेंडा फडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 12:25 PM2021-01-18T12:25:01+5:302021-01-18T12:26:03+5:30
भंडारा जिल्ह्यातील १४५ ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सकाळी दहा वाजता प्रारंभ झाला. निकाल ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील १४५ ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सकाळी दहा वाजता प्रारंभ झाला. निकाल ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. ग्रामपंचायतीचा निकाल बाहेर येताच गावकरी मोठा जल्लोष करीत असल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, साकोली, लाखनी, लाखांदूर, पवनी आणि मोहाडी तहसीलमध्ये ६० टेबलावर मतमोजणी सुरु आहे. तुमसर तालुक्यातील चुल्हाड ग्रामपंचायत काँग्रेसचा झेंडा फडकला असून डॉ. रमेश पारधी पॅनलचे 8 उमेदवार विजयी. भाष्कर सोनवणे गटाचे दोन व इतर एक उमेदवार विजयी.पिपरी चुन्नी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी तर सुकडी नकुल ग्रामपंचायत भाजपचा झेंडा फडकला आहे. पवनारखारी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून नवयुवक पॅनल समर्थीत ७ उमेदवार विजयी झाले. तर अपक्ष दोन व भाजपचे दोन उमेदवार विजयी.