देशाला मधक्रांतीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:21 AM2017-12-19T00:21:25+5:302017-12-19T00:22:12+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात येथील बनासकाढा येथे मधुक्रांतीची संकल्पना देशासमोर मांडली.
आॅनलाईन लोकमत
पवनी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात येथील बनासकाढा येथे मधुक्रांतीची संकल्पना देशासमोर मांडली. श्वेतक्रांती सोबत स्वीटक्रांती व्हावी यासाठी जनसहभागातून ग्रामीण युवकाला काम मिळावे व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे याकरिता हनिमिशन उपक्रम देशभरात राबविण्यात येत आहे.
ग्रामीण जनतेचा सर्वांगिण विकास करणे व पर्यायाने पर्यावरणाचे रक्षण करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून देशभरात मार्च महिन्यापर्यंत एक लाख मधमाशी पेट्यांचे वितरण करण्याचे उद्दिष्ट आहे. कुपोषित मुलांकिरता मिठ भाकरीच्या ऐवजी मध भाकर हा आहार उपलब्ध होवू शकतो. या उपक्रमाच्या माध्यमातून पुरक व्यवसायासोबत पीलन व वॅक्स काढण्याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना मिळणार आहे. देशभरात हनीमिशन कार्यक्रमात ५० लाख कि.ग्रॅम मधाचे उत्पादन करण्याचा उद्देश आहे. सोबतच मधाशी संबंधित ुउद्योग धंद्यामध्ये देखील वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले.
शिवाजी विज्ञान महाविद्यालयात रविवारला आयोजित कार्यक्रमाला विज्ञान संस्थेचे अध्यक्ष हेमंत काळमेघ, खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना, भंडारा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बीपी, आमदार रामचंद्र अवसरे, मुंबईचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यशोवर्धन बारामतीकर, खादी ग्रामोद्योग नागपूरचे निदेशक आर. गजभिये व शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य विजय लेपसे उपस्थित होते.
मधमाशीच्या माध्यमातून मध गोळा करणाऱ्या २०० पेट्यांचे वाटप या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रात दोन हजार पेट्यांचे वाटप केले जाणार असून मोदींच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला पवनी येथून सुरुवात झाल्याचे मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक भुवेंद्र रहिले व प्रा.किशोर सरनाईक यांनी केले. संचालन प्रा.डॉ.अविनाश अणे यांनी केले. आभार प्राचार्य विजय लेपसे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्राध्यापकवर्ग व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.