कौशल्यामुळेच देश प्रगतीच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:42 AM2021-09-17T04:42:10+5:302021-09-17T04:42:10+5:30

साकोली येथील वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था अंतर्गत वैनगंगा पॉलिटेक्निकमध्ये अभियंता दिवस साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. ...

The country is on the path of progress only because of skills | कौशल्यामुळेच देश प्रगतीच्या मार्गावर

कौशल्यामुळेच देश प्रगतीच्या मार्गावर

Next

साकोली येथील वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था अंतर्गत वैनगंगा पॉलिटेक्निकमध्ये अभियंता दिवस साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. या वेळी मुख्य मार्गदर्शक इंजिनीअर हेमंत संग्रामे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. जितेंद्रकुमार ठाकूर, अतिथी म्हणून प्राचार्य खेमराज राऊत उपस्थित होते.

त्याचबरोबर तृतीय वर्ष विद्युत अभियांत्रिकी विभागातील रोशन चाचेरे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. मुख्य मार्गदर्शक डॉ. ठाकूर यांनी अभियंता दिवस सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्म तारखेला भारत सरकारने अभियंता दिवस म्हणून १९६८ मध्ये घोषित केले. तेव्हापासून दरवर्षी १५ सप्टेंबर हा अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. विश्वेश्वरय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६० रोजी मैसूर कर्नाटकच्या कोल्हार जिल्ह्यात झाला. त्यांनी आपल्या जीवनामध्ये कृष्णराज सागर धरण, खडकवासला धरण, तेवढेच नाही तर हैदराबाद शहर बनवण्याचे संपूर्ण श्रेय डॉ. विश्वेश्वरय्या यांना जाते. त्यांनी पूर स्वरक्षण प्रणालीची रचना केली. त्याचबरोबर त्यांना मैसूरचे जनक असेही संबोधले जाते, असे सांगितले. संचालन प्रा. प्रीती कापगते, प्रस्ताविक विभाग प्रमुख तोफेद्र कोवे, आभार प्रदर्शन सुहास वालदे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रा. शुभांगी शिरसागर, प्रा. अतिश भोवते, प्रा. मुकेश पारधी, प्रा. पायल टेंभूर्णे, प्रा. सुनील बावनकर, महेश करंजेकर, अजय गायधने, दीपक लबाडे यांनी सहकार्य केले.

Web Title: The country is on the path of progress only because of skills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.