विषयाचे मर्म दाखविण्याचे साहस व्यंगचित्रात

By admin | Published: November 17, 2015 12:38 AM2015-11-17T00:38:47+5:302015-11-17T00:38:47+5:30

व्यंगचित्र हे विषयाचा मर्म दाखविण्याचे महत्वाचे कार्य करते. त्याचित्रातून घटनेची अभिव्यक्ती स्पष्ट होते.

The courage to show the tenacity of the subject in the cartoon | विषयाचे मर्म दाखविण्याचे साहस व्यंगचित्रात

विषयाचे मर्म दाखविण्याचे साहस व्यंगचित्रात

Next

राष्ट्रीय पत्रकार दिन : वामन तुरिले यांचे प्रतिपादन
भंडारा : व्यंगचित्र हे विषयाचा मर्म दाखविण्याचे महत्वाचे कार्य करते. त्याचित्रातून घटनेची अभिव्यक्ती स्पष्ट होते. सामान्य माणसाला सुध्दा या व्यंगचित्रातून विषयाचा सरळ सोपा अर्थ कळणे शक्य होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार वामनराव तुरिले यांनी व्यक्त केले.
जिल्हा माहिती कार्यालयात आयोजित राष्ट्रीय पत्रकार दिन कार्यक्रमात ‘अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून व्यंगचित्र व अर्कचित्र कलेचे महत्त्व आणि प्रभाव’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार रमेश सुपारे म्हणाले, व्यंगचित्र हे अभिव्यक्तीचे बोलके माध्यम आहे. कमीतकमी शब्दात अभिव्यक्त करण्याची कला व्यंगचित्रामध्ये आहे. व्यंगचित्रातून आपले विचार जनतेपर्यंत पोहचविता येतात. व्यंगचित्र हे माहिती देण्याचे काम करते.
छोटयाशा व्यंगचित्रातून न लिहिताही मोठा संदेश लोकांपर्यंत पोहचविता येतो. व्यंगचित्र हा वर्तमानपत्राचा दागिणा आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार वामनराव तुरिले यांनी अमृत महोत्सवी वर्षात पर्दापण केल्यानिमित्त त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे, उन्नीकृष्णन, मनोहर सप्रे यांच्या व्यंगचित्रांविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी गोपू पिंपळापूरे, विजय खंडेरा यांची समयोचित भाषणे झाली.
यावेळी इंद्रपाल कटकवार, देवानंद नंदेश्वर, दीपक फुलबांधे, नरेश बोपचे, दीपक रोहणकर, राजु मस्के, अनिल आकरे, दिपेंद्र गोस्वामी, रवि खोब्रागडे, समीर नवाज, विलास केजरकर, सुरेश फुलसुंगे उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: The courage to show the tenacity of the subject in the cartoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.