संगनमताने जमीन हडपली
By admin | Published: July 31, 2015 01:07 AM2015-07-31T01:07:31+5:302015-07-31T01:07:31+5:30
पवनी तालुक्यातील सोमनाळा (बुज.) येथील शेतकरी बळीराम चिंगा रामटेके यांच्या जमिनीवरचा अवैध फेरफार करून तत्कालीन तलाठी, कोंढा यांनी रामटेके यांच्या मालकीच्या शेतीपैकी काही शेती दुसऱ्याच्या नावे केली.
पत्रपरिषद : न्यायासाठी शेतकरी फिरतोय दारोदार
पवनी : पवनी तालुक्यातील सोमनाळा (बुज.) येथील शेतकरी बळीराम चिंगा रामटेके यांच्या जमिनीवरचा अवैध फेरफार करून तत्कालीन तलाठी, कोंढा यांनी रामटेके यांच्या मालकीच्या शेतीपैकी काही शेती दुसऱ्याच्या नावे केली. सदर शेतकरी दोन वर्षापासून अन्यायाच्या विरोधात न्यायासाठी शासनाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या दारोदारी फिरत आहे. पण कोणीही त्याची दखल घेत नसल्याची आपबिती बळीराम रामटेके यांनी पवनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत कथन केली.
पत्रकार परिषदेत आपली, आपबिती बळीराम रामटेके यांनी कथन करताना सांगितले की, त्यांची वडिलोपार्जीत शेती मौजा सोमनाळा येथे ख.नं. २५४ त.सा. क्रं. १४ गट नं. ७२/१ आराजी ०.७१ हे.आर. या शेतीचा जुना गट नं. ७२ आराजी १.१५ हे.आर. होता. या शेतीपैकी गोसीखुर्द धरणाच्या कालव्यात ०.४९ हे.आर. जमीन गेली. सदर शेती १९९८ ते २००९ पर्यंत बळीराम रामटेके यांच्याच नावे होती व त्या शेतीवर त्यांचाच कब्जा होता. सदर जमीन सन २००९ मध्ये कोणालाही विकलेली नसताना त्या जमिनीवर २००९ मध्ये हिरकन्या रामटेके यांचे नाव त्या जमिनीच्या गटावर कसे आले हे एक कोडे असून नंतर त्यांना त्या जमिनीचे विक्रीपत्र करून दिले व आता त्या जमिनीवर २००९-१० मध्ये त्या जमिनीवर मुनेश्वर गोस्वामी यांचे नाव आले आहे.
तत्कालीन तलाठी कोंढा यांनी वरील व्यक्तीच्या संगनमताने बळीराम रामटेके यांनी जमीन विकलेली नसतानाही केवळ जुन्या गट क्रमांकाच्या ५३२, आराजी ०.९२ हे.आर. शेती पैकी गोसीखुर्द धरणात गेलेली ०.२१ हे.आर. या शेतीच्या आदेशाचा पुरावा सादर करून फेरफार क्रमांक ६१२ दि.१७ आॅगस्ट २००९ ला दिवाणी न्यायालय पवनी केस नं. ७६/९९ सत्र न्यायालय अपील क्रमांक १२०/२००५ नुसार प्रत्यक्षात धरणात गेलेली बळीराम रामटेके यांची ०.४४ हे.आर. १७ आॅगस्ट २००९ ला हिरकन्या जीवन रामटेके यांचे नावे केली.
त्यानंतर तीन महिन्यातच हिरकन्या हिने तिचा भाचा मुनेश्वर गोस्वामी यांचे नावाने विक्री करून दिले व २००९ लाच मुनेश्वरने बळीरामकडून बळजबरीने जमिनीचा ताबा घेतला व शेती हडप केली. यासंबंधाने बळीराम यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेवून राज्य माहिती आयोग, खंडपीठ नागपूर यांचे अपील क्रमांक १०७९/२०१२ वर ६ नोव्हेंबर २०१२ जा.कं्र. ६१९४ दि. १९ डिसेंबर २०१२ नुसार आदेश झाला असतानाही तहसिलदार पवनी व उपविभागीय अधिकारी भंडारा यांनी अजुनपर्यंत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. या संदर्भात जिल्हाधिकारी भंडारा यांचेकडे अपील दाखल करूनही अजुनपर्यंत कोणताही न्याय मिळाला नाही. त्यामुळे मानसीकता बिघडून न्यायासाठी दारोदार भटकत आहेत. पण अजुनपर्यंत न्याय न मिळाल्याची खंत पत्रकार परिषदेत बळीराम रामटेके यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)