गाई व म्हशीच्या दूध दरात घसघशीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 11:04 PM2019-06-03T23:04:50+5:302019-06-03T23:05:08+5:30
राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड व भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाचे वतीने १ जून रोजी येथे जागतिक दूध दिवस व दुग्ध उत्पादक मार्गदर्शन मेळावा साजरा करण्यात आला. संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी यांनी जागतिक दूध दिनाचे औचित्य साधून गाईच्या दुधाला प्रतिलिटर ३.५० रुपये व म्हशीच्या दुधाला प्रतीलिटर १ रुपये वाढ करण्यात आल्याचे सांगितले. गाईचे दूध २२.५० रुपयांवरून २६ रुपये तर म्हशीचे दूध प्रतिलिटर ३४ वरून ३५ रुपये करण्यात आल्याचे सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड व भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाचे वतीने १ जून रोजी येथे जागतिक दूध दिवस व दुग्ध उत्पादक मार्गदर्शन मेळावा साजरा करण्यात आला. संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी यांनी जागतिक दूध दिनाचे औचित्य साधून गाईच्या दुधाला प्रतिलिटर ३.५० रुपये व म्हशीच्या दुधाला प्रतीलिटर १ रुपये वाढ करण्यात आल्याचे सांगितले. गाईचे दूध २२.५० रुपयांवरून २६ रुपये तर म्हशीचे दूध प्रतिलिटर ३४ वरून ३५ रुपये करण्यात आल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार सुनील मेंढे तर विशेष अतिथी म्हणून माजी खासदार मधुकर कुकडे, भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे होते.
प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, माजी नगरपरिषद उपाध्यक्ष बशीर पटेल, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, एनडीडीबीचे प्रतिनिधी डॉ.चंद्रशेखर डाखोळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.नितीन फुके, डॉ.हरिश भोंगाडे, नगरपरिषदचे उपाध्यक्ष आशू गोंडाणे, धनराज साठवणे तसेच भंडारा जिल्हा दूध संघाचे संचालक महेंद्र गडकरी, राम गाजीमवार, आशिष पातरे, नरेश धुर्वे, लक्ष्मीकांत सेलोकर, संतोष शिवणकर, रिता हलमारे, अनिता साठवणे उपस्थित होते.
यावेळी खासदार सुनील मेंढे बोलताना दूध व्यवसायाने ग्रामीण भागाची आर्थिक स्थिती उंचावेल. शासन शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील आहे. शेतकऱ्यांनी फक्त शेतीवरच अवलंबून न राहता लहान मोठे कृषी उद्योग करून प्रगती साधण्याचे आवाहन केले.
सुनील फुंडे पुढे म्हणाले की संघाचे विद्यमान संचालक मंडळाने कार्यभार हाती घेतला त्यावेळी संघ १२ कोटी रुपयाच्या तोट्यात होता. दूधाचे संकलन सुद्धा फक्त २२ हजार लिटर होते. आज संघाचे १७ कोटी रुपये राज्य शासनाकडे आहे. दुधाचे चुकारे प्रलंबित असले तरी संघ सर्व चुकारे देण्यास कटीबद्ध असून दूध उत्पादकांनी संघालाच चांगल्या प्रतीचे दूध देण्याचे आवाहन करण्यात आले. माजी खासदार मधुकर कुकडे यांनीही दुग्ध व्यवसाय हा खºया अर्थाने ग्रामीण भागाच्या उन्नतीचा व्यवसाय असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ.नितीन फुके, डॉ.चंद्रशेखर डाखोळे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी यांनी केले. त्यांनी दुधाची विद्यमान स्थिती उपस्थित दूध उत्पादक शेतकरी व मान्यवरांना मार्गदर्शनात सांगितले.
संचालन संघाचे कार्यकारी संचालक करण रामटेके यांनी तर आभार दूध संकलन विभाग प्रमुख आनंद पडोळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संघाचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.