वाघाच्या हल्ल्यात गाय ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 10:21 PM2018-09-03T22:21:52+5:302018-09-03T22:22:23+5:30
बावनथडी नदीचे काठावर असणाऱ्या सोंड्या गावाचे शेजारील घनदाट जंगलात वाघाने बस्तान मांडले आहे. या वाघाचे हल्ल्यात गाय ठार झाली असून गावात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. ही घटना रविवारला सकाळच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : बावनथडी नदीचे काठावर असणाऱ्या सोंड्या गावाचे शेजारील घनदाट जंगलात वाघाने बस्तान मांडले आहे. या वाघाचे हल्ल्यात गाय ठार झाली असून गावात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. ही घटना रविवारला सकाळच्या सुमारास घडली.
सिहोरा परिसरात असणाºया ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळांचे घनदाट जंगलात वाघांनी बस्तान मांडले आहे. या वाघांनी गावाचे दिशेने मोर्चा वळविण्यास सुरुवात केली आहे. बावनथडी नदीचे काठावर असलेल्या सोंड्या गावाचे शेजारी घनदाट जंगल आहे. या जंगलात असणाºया वाघाने गावालगत शेतशिवारात चराईकरिता सोडण्यात आलेल्या गाईवर सकाळी ८ वाजेच्या सुमारास हल्ला केला. यात गाय ठार झाली असून गावातील शेतकरी शामराव लांजे यांचे नुकसान झाले आहे. गावाचे दिशेने वाघ धावत येत असल्याचे गावकºयांना दिसताच त्यांनी पाठलाग केला असता घराचे शेजारी गाय मृतावस्थेत दिसून आले आहे. या मृत गाईचे शेजारी वाघाचे पंजे दिसून आल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा ढवळ्या गावात नागरिकांनी फिरणे बंद केले आहे.
याच गावात वन विभागाने कर्मचाºयांकरिता इमारतीचे बांधकाम केले आहे. परंतु इमारत जीर्ण झाल्याने कुणी कर्मचारी यल्ला इमारतीत थांबत नाही. या जंगलात सातत्याने हिंसक प्राण्यांची वाढती संख्या असल्याने शिकारीचे नजरा खिळल्या असून वन विभागाने सावध भूमिका घेण्याची गरज आहे.