शेतकºयांच्या समस्यांसाठी भाकपचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 09:25 PM2017-09-03T21:25:12+5:302017-09-03T21:25:27+5:30
शेतकरी व कष्टकºयांच्या समस्यांच्या निवारणासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शेतकरी व कष्टकºयांच्या समस्यांच्या निवारणासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.
१ सप्टेंबर हा दिवस किसान मागणी दिन म्हणून साजरा करण्याच्या आवाहनानुसार जिल्हाधिकारी यांना भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके व किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष सदानंद इलमे यांच्या नेतृत्वात शेतकºयांच्या ११ मागण्यांचे निवेदन एका शिष्टमंडळाच्या मार्फत देण्यात आले. मागण्यांमध्ये शेतकºयांची सरसकट संपूर्ण कर्जमाफी करू सातबारा कोरा करावा, ठरावीक मुदतीत कर्जाची परतफेड करणाºया शेतकºयांचे पैसे परत करावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, ६० वर्षावरील शेतकरी, कष्टकरी व असंघटीत कामगारांना दहा हजार रूपये मासिक पेंशन द्या, सर्व राज्य व केंद्र सरकारने शेतकºयांच्या हमी भावासाठी किमती स्थिरता निधी निर्माण करावे. पंतप्रधान पीक विमा योजना एच्छिक करण्यात यावे, सिंचनाच्या पुरेशा सोयी उपलब्ध करून शेतीला २४ तास विज पुरवठा करावे, वनहक्क व महसुली कायद्यांतर्गत जबरानजोतदार व अतिक्रमणधारकांना शेती व घराचे पट्टे द्यावे, गावठाणच्या जागेवरील झुडपी जंगलाचे निर्वणीकरण करावे, भूमीहीन व बेघर कुटुंबांना घरे व शेतीसाठी जमिनी द्यावे, सुरेवाडा येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, नागरी सुविधा व भूखंडाच्या अनियमिततेची चौकशी करून योग्य कारवाई करण्यात यावी या मागण्यांचा समावेश होता.
यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी त्यांच्या अखत्यारितील मागण्यांची दखल घेऊन अन्य मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात वामनराव चांदेवार, सुरेंद्र सुखदेवे, हरिदास जांगडे, गजानन पाचे यांचा समावेश होता तर याप्रसंगी अरुण पडोळे, धनराज झंझाड, मिताराम उके, प्रकाश उईके, डी.डी. कान्हेकर, रत्नाकर मारवाडे, मंगेश माटे आदींचा समावेश होता.