महामार्गावर वर्षभरात भेगा, रस्ता बांधकामावर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 03:42 PM2024-06-28T15:42:43+5:302024-06-28T15:43:57+5:30

चौकशीची मागणी : कारधा ते नीलज राष्ट्रीय महामार्गावरील प्रकार

Cracks on the highway during the year, a question mark on road construction | महामार्गावर वर्षभरात भेगा, रस्ता बांधकामावर प्रश्नचिन्ह

Cracks on the highway in a the year

लोकमत न्यूज नेटवर्क 
कोंढा-कोसरा :
कारधा ते नीलज राष्ट्रीय महामार्गाचे काम कासव गतीने सुरू आहे. कामावर एक वर्षात पवनी ते कोंढादरम्यान मोठमोठ्या भेगा पडल्याने कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच भेगांमुळे अनेक दुचाकीस्वार पडून जखमी झाले आहेत. त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशीची मागणी जोर धरत आहे.


नागपूर कोलकाता राष्ट्रीय महामार्गाला लागून कारधा नीलज राज्य मार्गास राष्ट्रीय महामार्ग क्र. २५३ अशी मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार याचे काम कंत्राटदारामार्फत सुरू आहे. पण, काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचे रस्त्याची अवस्था पाहिल्यानंतर दिसून येते. कोंढा ते पवनीपर्यंत महामार्गावर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.


रस्त्याच्या मधोमध भेगा असल्याने सायकलस्वार, मोटारसायकलस्वारांचे चाक खड्यात जाऊन अनेक दुचाकीस्वार पडले आहेत. चार दिवसांपूर्वी कोंढा येथील नंदकिशोर नागपुरे पवनीहून येत असताना रस्त्याच्या उभ्या पडलेल्या भेगेत गाडीचे चाक जाऊन गाडीवरून पडले. त्यामुळे त्यांचे पाय मोडले. अशा अनेक घटना दररोज महामार्गावर तरीदेखील याकडे होत आहेत. कंत्राटदाराचे दुर्लक्ष होत आहे. सध्या मोटारपंप शेतकरी रोवणी करीत आहेत, चिखल घेऊन ट्रॅक्टर असणारे शेतातील रोडवर माती चिखल महामार्गावर पसरवीत असल्यानेदेखील अपघात होत आहे- कारधा नीलज महामार्गाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे- एक वर्षातच या महामार्गाला ठिकठिकाणी उभ्या भेगा पडल्या आहेत.


चौकशीची मागणी
काम करताना योग्य काँक्रीट, सिमेंट याचा वापर केला नाही. राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी माझ्या विभागात कोणताही भ्रष्टाचार नाही, असे म्हणत असतात. पण, महामार्गाचे काम पाहिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर महामार्गाच्या कामात गैरप्रकार झाल्याचे दिसून येते. चौकशी करून भेगा बुजविण्याचे काम करावे व होत असलेले अपघात टाळावेत, अशी मागणी कोंढा येथील मुरली नागपुरे व गावकऱ्यांनी केली आहे.
 

Web Title: Cracks on the highway during the year, a question mark on road construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.