जनतेत आपलेपणाची भावना निर्माण करा
By admin | Published: April 11, 2016 12:31 AM2016-04-11T00:31:47+5:302016-04-11T00:31:47+5:30
एखाद्या शासकीय कार्यालयात गेल्यावर हे कार्यालय आपले आहे अशी भावना सामान्य माणसाच्या मनात निर्माण झाली पाहिजे.
जगन्नाथ भौर यांचे प्रतिपादन : समता सप्ताहाचे उदघाटन
भंडारा : एखाद्या शासकीय कार्यालयात गेल्यावर हे कार्यालय आपले आहे अशी भावना सामान्य माणसाच्या मनात निर्माण झाली पाहिजे. हे शासन, प्रशासन आपल्यासाठी काम करते याची जाणीव झाली तरच जनता शासकीय कार्यालयात जाऊन आपले प्रश्न सोडवू शकतील. जनतेमध्ये ही आपलेपणाची भावना निर्माण करण्याचे काम शासन, प्रशासनात काम करणाऱ््यांनी केले पाहिजे, असा अर्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होता, असे प्रतिपादन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती निमित्त आयोजित समता सप्ताहाच्या उदघाटन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी अमित मेश्राम, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, सहाय्यक आयुक्त देवसुदन धारगावे उपस्थित होते.
भोर म्हणाले, समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला. मात्र, त्यांना अपेक्षित असलेली समता आपण अजूनही प्रस्थापित करू शकलो नाही. श्रीमंती- गरीबीची दरी वाढत आहे. महिलांना अजूनही सामान न्याय मिळालेला नाही. समता सप्ताहाच्या निमित्ताने सर्व समाजात समता प्रस्थापित करू याचा निर्धार करुया, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी अमित मेश्राम म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणापासून ते सिंचनापर्यंत सर्व क्षेत्रात काम केले. दामोदर व्हॅली सारखे धरण बांधण्याची योजना त्यांची होती. देशातल्या सर्व भागातनैसर्गिक साधन सामुग्रीचा समान वाटा सवार्ना मिळाला पाहिजे हे त्यांची न्याय बुद्धी होती. बाबासाहेबांचे असे अनेक कार्य आहेत जे अद्यापही लोकांना माहिती नाही.
इतके अफाट काम एका आयुष्यात या महामानवाने जिथे पुढारलेल्या देशांनीही महिलांना मतदानाचा हक्क देण्यास टाळाटाळ केली तिथे स्वतंत्र भारतातील महिलांना लगेच मतदानाचा हक्क केवळ बाबासाहेबांमुळे मिळू शकला. स्त्रियांना प्रसूती रजा देण्याचा अधिकार असो की, संपत्ती मधे समान वाटा, बाबासाहेबांनी महिलांना पुरुषांच्या बरोबरीत समानता दिली. मात्र स्वातंत्र्याच्या ६९ वषार्नंतर सुद्धा आजही महिलांना मंदिरात प्रवेश बंदी केली जाते.
शिक्षण, नोकरी, राजकारण कुठेही महिलांना समान संधी अजूनही मिळाल्या नाहीत. आजही त्यांना ३३ टक्के आरक्षणाच्या बेडीत अड़कवून ठेवले आहे. म्हणजेच बाबासाहेबांना जी समता अभिप्रेत होती ती आपण अजूनही प्रस्थापित करू शकलो नाही असे मत मनीषा सावळे यांनी व्यक्त केले.
समाज कल्याण सहाय्यक आयुक्त धारगावे यांनी प्रस्ताविक करताना बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंती वर्षा निमित्त करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. तसेच समता सप्ताहांत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहितीही यावेळी सांगितली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाला दलित मित्र, सामाजिक कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. (प्रतिनिधी)