ग्राहकाभिमुख सेवेसाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:13 AM2021-08-02T04:13:05+5:302021-08-02T04:13:05+5:30
येथील दूरसंचार विभागाच्या कार्यालयात दूरसंचार सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपमहाव्यवस्थापक विलास तांडेकर, बनसोड, समितीचे सदस्य ...
येथील दूरसंचार विभागाच्या कार्यालयात दूरसंचार सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपमहाव्यवस्थापक विलास तांडेकर, बनसोड, समितीचे सदस्य मोहन सूरकर, लायकराम भेंडारकर, धनप्रकाश भैरम, विकास मदनकर, मयूर बिसेन, ललित शुक्ला, स्वानंद पारधी यांच्यासह दूरसंचार विभागाचे भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.
विभागाची कार्यप्रणाली समजून घेतल्यानंतर भंडारा व गोंदिया अशा दोन्ही जिल्ह्यात असलेल्या ग्राहक संख्येची माहिती खासदारांनी घेतली. आपली सेवा अधिक प्रभावी आणि दर्जेदार ठरेल यासाठी काही नवीन प्रयोग किंवा प्रयत्न करण्याच्या सूचना खासदारांनी केल्या. अन्य कंपन्यांचे नेटवर्क प्रभावी नाही अशा ठिकाणी बीएसएनएलला अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करा असे सांगितले. ग्राहकांच्या तक्रारी आणि अडचणी अधिकाऱ्यांनी आवर्जून ऐकून घ्याव्यात. त्याकडे दुर्लक्ष न करता सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत. जिल्ह्यातून आलेल्या सदस्यांनी त्यांच्या-त्यांच्या भागातील तक्रारी बैठकीत मांडल्या. या तक्रारीच्या अनुषंगाने तालुका आणि जिल्हास्तरावर विकास करण्याच्या दृष्टीने योग्य तो आराखडा तयार करण्याचे निर्देश यावेळी खासदारांनी दिले.