पूरक समुपदेशन कार्यक्रम तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 09:25 PM2018-07-29T21:25:42+5:302018-07-29T21:26:01+5:30
भाषा, गणित पेटीतील साहित्यांचे उपयोग करून विद्यार्थी प्रगत होण्यासाठी प्रभावी उपाययोजना करून अभ्यासात मागे असलेल्या मुलांसाठी पूरक समुपदेशन होईल, असा कृती कार्यक्रम तयार करावा, असे निर्देश भंडारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांनी दिले.
Next
ठळक मुद्देगटशिक्षणाधिकारी : भंडारा येथे तालुकास्तरीय शिक्षण परिषद
<p>लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भाषा, गणित पेटीतील साहित्यांचे उपयोग करून विद्यार्थी प्रगत होण्यासाठी प्रभावी उपाययोजना करून अभ्यासात मागे असलेल्या मुलांसाठी पूरक समुपदेशन होईल, असा कृती कार्यक्रम तयार करावा, असे निर्देश भंडारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांनी दिले.
भंडारा पंचायत समिती गटसाधन केंद्र भंडाराच्यावतीने तालुकास्तरीय शिक्षण परिषदेत ते बोलत होते. प्रमुच पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी कविता पाटील, विषय साधन व्यक्ती आर. डी. वाडीभस्मे, विषय सहाय्यक डॉ. रवींद्र जनबंधू, सुजित उईके, आयई वंदना गोडघाटे, विशेष शिक्षक सुधीर भोपे प्रामुख्याने उपस्थित होते.
शंकर राठोड म्हणाले, पायाभूत चाचणीबाबत नियोजन वेळापत्रक व त्यासाठी तयारी करण्यात यावी, अभ्यासात मागे असलेल्या मुलांसाठी पूरक समुपदेशन होईल असा कृती कार्यक्रम तयार करण्यात यावा. प्रत्येक मुल शिकल पाहिजे. आरटीई कायदा २००९ व प्रगत शैक्षणिक महाराष्टÑाचा शासन निर्णय प्रत्येक शाळेत असायला पाहिजे. त्याचे वाचन शिक्षकांनी करुन प्रमुख मुद्दे लक्षात ठेवावयास पाहिजे. प्रत्येक मुलापर्यंत पुस्तके पोहचल्या पाहिजेत. पीआरसी भेट देणार असल्याने रेकॉर्ड परिपूर्ण ठेवावा. अनुदान खतावणी योग्यपणे करण्यात यावी. एसएमसी सभा व त्यांचे कार्य वृत्त नोंदवून ठेवावे. शालेय स्वच्छता वार्षिक, मासिक, दैनिक टाचण काढा. त्याचप्रमाणे अध्ययन अनुभव साहित्यासह द्या. गणवेश, शालेय पोषण आहार, विद्यार्थी सुरक्षा, भौतिक सुविधा, दप्तरांचे ओझे कमी करणे याबबतही त्यांनी सर्व मुख्याध्यापकांना अनुदेश दिले. विस्तार अधिकारी कविता पाटील म्हणाल्या वृक्ष आहे आमुचे प्राण, देऊ त्याला जीवदान या उक्तीप्रमाणे झाडं लावू या. जगलेल्या झाडांची निगा राखू या. शाळेतील झाड जगली पाहिजेत, याकडे विशेष लक्ष दयावे.
विषय साधन व्यक्ती आर. डी. वाडीभस्मे म्हणाले, डीआयइसीपीडी भंडारा यांच्या नियोजनानुसार अध्ययनस्तर चाचणी प्रारंभिक घेण्यात येत आहे. यात यावर्षी इंग्रजी विषयाचा समावेश करण्यात आला आहे. चाचणी व प्रश्न स्वरुप ठरविण्यात आले आहे. अध्ययन निष्पती, घडीपत्रके पालकापर्यंत पोहचली का याची शहानिशा करावी. शिक्षक मार्गदर्शक पुस्तके वाचनाचे महत्वही त्यांनी सांगितले. दिक्षा अॅप डाऊनलोड करुन तेथील स्कॅनरवरुन पुस्तकातील क्युआर कोड स्कॅन करणे व पाठ्यपुस्तक पाहणे याबाबतही त्यांनी माहिती सांगितली.
डॉ. रविंद्र जनबंधू म्हणाले, तेजस हे इंग्रजी संभाषण व संवादासाठी एक मॉडेल प्रोजेक्ट आहे. ब्रिटीश कौन्सील, टाटा इन्स्टिटयूट, महाराष्टÑ शासन यांचे संयुक्त प्रयत्नाने तेजस सुरु करण्यात आला. टीचर अॅक्टीव्हिटी ग्रुप मध्ये सहभाग घेण्यासाठी लिंक नोंदणी करायची आहे. इंग्लीश टिचर लर्निंगसाठी ४८ जीबी डाटा वर्गनिहाय उपलब्ध आहे. मुलांचे व शिक्षकांचे स्व-विकास सहज होते. प्रत्येकाने यात सहभागी व्हावे, एकमेकांना लिंक भरण्यासाठी मदत करा.
वंदना गोडघाटे यांनी विशेष बालकांसाठी अध्ययन स्तर, चाचणी स्तर निश्चित करणे, दिव्यांगत्वाचे प्रमाण जास्त असणारे विशेष बालकांचे स्तर विशेष शिक्षक कसे ठरविणार, त्यांचे टूलस् अल्प प्रमाण असणारे बालकांचे स्तर याबाबत माहिती सांगून त्यानुसार कोणकोणत्या उपाययोजना केल्या जातील याबाबत माहिती दिली.
सुजीत उईके यांनी एसडीएमआयएस डाटाबेस मध्ये अपडेट करणे, परिपूर्ण माहिती, स्कूल पोर्टलमधील माहिती तत्परतेने भरुन समस्या कमी करता येतात हे सांगून तांत्रिक समस्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यानंतर सुधीर भोपे यांनी सुध्दा मार्गदर्शन केले.
उपस्थितांचे आभार केंद्रप्रमुख काटेखाये यांनी तर संचालन हेमलता नागदेवे यांनी केले. शिक्षण परिषदेला लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या कर्मचारी वृंदांनी सहकार्य केले.