ग्रामीण भागात प्रतिभावंत खेळाडू निर्माण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 09:47 PM2018-12-27T21:47:14+5:302018-12-27T21:47:36+5:30
ग्रामीण भागात प्रतिभावंत खेळाडू आहे. त्यांना योग्य व्यासपीठ प्राप्त होत नसल्याने आंतरराज्यीय स्तरावर पोहचत नाही. त्यांना योग्य मार्गदर्शन, कला प्रदर्शित करण्याची संधी मिळाली पाहिजे. ग्रामीण भागात कबड्डी आणि कुस्ती स्पर्धाचे आयोजन केल्याने अनेकांना प्रेरणा, तर प्रतिभावंत खेळाडूंचे आत्मविश्वास उंचाविण्याची संधी प्राप्त होणार आहे, असे प्रतिपादन स्व. मनोहरभाई पटेल अॅकेडमी गोंदियाच्या अध्यक्षा वर्षा पटेल यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : ग्रामीण भागात प्रतिभावंत खेळाडू आहे. त्यांना योग्य व्यासपीठ प्राप्त होत नसल्याने आंतरराज्यीय स्तरावर पोहचत नाही. त्यांना योग्य मार्गदर्शन, कला प्रदर्शित करण्याची संधी मिळाली पाहिजे. ग्रामीण भागात कबड्डी आणि कुस्ती स्पर्धाचे आयोजन केल्याने अनेकांना प्रेरणा, तर प्रतिभावंत खेळाडूंचे आत्मविश्वास उंचाविण्याची संधी प्राप्त होणार आहे, असे प्रतिपादन स्व. मनोहरभाई पटेल अॅकेडमी गोंदियाच्या अध्यक्षा वर्षा पटेल यांनी केले.
आधार युवा बहुउद्देशीय क्रीडा संस्था सिहोरा, जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समिती सभापती धनेंद्र तुरकर आणि महिला बालकल्याण समिती सभापती रेखा ठाकरे यांच्या संयुक्त विद्यमाने सिहोरा येथील बाजार चौकात आयोजित सभापती चषक कबड्डी आणि कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक रामदयाल पारधी होते. कबड्डी आणि कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन स्व. मनोहरभाई पटेल अॅकेडमीच्या अध्यक्षा वर्र्षा पटेल यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, प्रदेश उपाध्यक्ष धनंजय दलाल, अर्थ व शिक्षण समिती सभापती धनेंद्र तुरकर, महिला व बाल कल्याण समिती सभापती रेखा ठाकरे, माजी नगराध्यक्ष विजय डेकाटे, जिल्हा परिषद सदस्या प्रेरणा तुरकर, प्रतिक्षा कटरे, शुभांगी रहांगडाले, गीता माटे, संगिता मुंगुसमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवचंद ठाकरे, उमेश तुरकर, उमेश कटरे, राजकुमार माटे, पंचायत समितीचे माजी सभापती कलाम शेख, डॉ. विनोद, सरपंच मधु अडमाचे, शिशुपाल गौपाले, उपसरपंच देवशिला तुरकर, फिरोज पठाण, भाऊराव राऊत, धर्मराज बिसेन, शुशिल कुंभारे, चेतना बर्डे, तिर्थकला पराते, कविता घोडीचोर, संगिता बन्सोड, मनिषा तुरकर, ज्योती बिसने, कादर अन्सारी, सलाम शेख, संस्था अध्यक्ष धनंजय तुरकर, परशुराम पडोळे उपस्थित होते.
वर्षा पटेल म्हणाल्या, गोंदिया जिल्ह्यात कॅन्सर रुग्णांच्या सेवेकरिता रिलांयन्स कॅन्सर रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. गोंदिया भंडारा जिल्ह्याचे विकासाकरिता खासदार प्रफूल पटेल यांनी विकासगंगा खेचून आणण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांच्या धानाला दर मिळाले पाहिजे. याकरिता ते प्रयत्नशिल आहेत. जिल्ह्यात विकासाचा अजेंडा राबविण्याची आवश्यकता आहे. या जिल्ह्यातील तळागाळातील सामान्य लोकांना न्याय मिळाले पाहिजे. चार महिन्यानंतर निवडणुकीचे माध्यमातून कुस्त्या होणार आहेत. याकरिता मतदारांनी जागृत झाले पाहिजे.
स्व. मनोहरभाई पटेल अॅकेडमीचे माध्यमातून विविध सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आयोजित कार्यक्रमात नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल, कलाम शेख, रामदयाल पारधी यांचे समायोचित भाषणे झाली.वर्षा पटेल यांच्या हस्ते प्रवेशद्वार बांधकामाचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमात सहभागी अतिथींना मानपत्र देण्यात आले.
या स्पर्धेत रामदास वडीचार, बळीराम वधारे, गंगादास तुरकर, ओ.बी. गायधने, अशोक गाढवे यांनी निर्णय कमिटीमध्ये कार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनेंद्र तुरकर यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन पंचायत समिती सदस्य अरविंद राऊत यांनी केले.
कार्यक्रमाला आधार युवा बहुउद्देशिय क्रीडा संस्था, ग्रामपंचायत कार्यालय, सिहोरा येथील नागरिक, युवा मंडळ, महिला बचत गट, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, मंडळाचे पदाधिकारी यांनी सहकार्य केले.
स्पर्धेत विदर्भ केसरीचा सहभाग
कुस्ती स्पर्धेत विदर्भातील अनेक स्पर्धेत नामांकित ठरलेल्या खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. यात नवनाथ बिसनवार वर्धा, सोहेल खान अमरावती, अक्षय कडव, समीर सोलोकर, सुमेद चामट भंडारा, प्रणाली झंझाड हरदोली, माधुरी मते धुसाळा, कैलास मते, अपेक्षा राखडे काटी यांचा समावेश आहे. कबड्डी स्पर्धेत २० चमुंनी सहभाग घेतला असून कुस्ती स्पर्धेत १५० मल्ल सहभागी झाली आहेत. परिसरात प्रथमत:च कबड्डी आणि कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली.